वडाळी परिसरातून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:12 IST2021-05-01T04:12:12+5:302021-05-01T04:12:12+5:30

अमरावती : फ्रेजरपुरा हद्दीतील वडाळी परिसरातून एका तरुणाची दुचाकी लंपास करण्यात आली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. सौरभ गेंदालाल ...

Two-wheeler lampas from Wadali area | वडाळी परिसरातून दुचाकी लंपास

वडाळी परिसरातून दुचाकी लंपास

अमरावती : फ्रेजरपुरा हद्दीतील वडाळी परिसरातून एका तरुणाची दुचाकी लंपास करण्यात आली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. सौरभ गेंदालाल बेनिवाले (२० रा. परिहारपुरा, वडाळी) यांनी घराजवळील समाजमंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एमएच २७ बीडी ७९२७ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. सौरभने या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. त्यानुसार अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.------------------------------------------

एकतर्फी प्रेमातून जीवे मारण्याची धमकी

अमरावती : एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. अनिल प्रल्हाद कोंडे (रा. साईनगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने फोन करून म्हटले की, मी तुझ्यावर बरेच दिवसांपासून प्रेम करतो, तू हो नाही म्हणाल्यास एकतर तुझा जीव जाईल, नाहीतर माझा, अशी धमकी दिली. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.

Web Title: Two-wheeler lampas from Wadali area