रामपुरी कॅम्प परिसरातून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:25+5:302021-01-08T04:38:25+5:30
---------------------------------------------------- कामुंजा येथून दोन गाईंची चोरी अमरावती : वलगाव ठाण्यांतर्गत कामुंजा येथून १२ हजार रुपये किमतीच्या दोन गाईंची चोरी ...

रामपुरी कॅम्प परिसरातून दुचाकी लंपास
----------------------------------------------------
कामुंजा येथून दोन गाईंची चोरी
अमरावती : वलगाव ठाण्यांतर्गत कामुंजा येथून १२ हजार रुपये किमतीच्या दोन गाईंची चोरी केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी सतीश किसनराव आप्पा मारोडकर (६०, रा. कामुंजा) यांनी वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. खुट्याला बांधलेल्या गाई चोरट्याने चोरून नेल्या.
-------------------------------------------------------
अश्लील शिवीगाळ
अमरावती : दरवाज्यात प्रवेश करून अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना भातकुली ठाणे हद्दीतील हरतोटी येेथे मंगळवारी घडली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी बंडू ऊर्फ नारायण रामचंद्र राणे (३७, रा. हरतोटी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------------------------
गॅस शेगडी धोकादायक स्थितीत ठेवल्याप्रकरणी कारवाई
अमरावती : व्यवसाय करताना गॅस शेगडी धोकादायक ठिकाणी ठेवल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी पाच वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया केल्यात. ही कारवाई चपराशिपुरा, चैतन्य कॉलनी, जयहिंद चौक बडनेरा येथे करण्यात आली. पाच आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
------------------------------------------------
सिद्धार्थनगरात जुगार पकडला
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी येथील सिद्धार्थनगरात कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १,१५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी रामनाथ कन्हैयालाल वाघमारे (४२, रा. सिद्धार्थनगरा नवसारी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.