शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
4
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
5
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
6
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
7
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
8
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
9
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
10
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
11
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
12
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
13
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
14
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
15
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
16
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
17
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
18
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
19
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
20
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल

मेळघाटातील घटांग घाटात दोन ट्रक उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:53 IST

लगतच्या घटांग घाटात सततच्या पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर चिकन माती आल्याने दोन दिवसात दोन ट्रक उलटल्याची घटना शनिवारी उघड झाली. परतवाडा, घटांग, धारणी, इंदूर असा आंतरराज्य महामार्ग असून मागील आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावली.

ठळक मुद्देआंतरराज्य महामार्गावर अपघात। रस्त्यावर आली माती

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : लगतच्या घटांग घाटात सततच्या पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर चिकन माती आल्याने दोन दिवसात दोन ट्रक उलटल्याची घटना शनिवारी उघड झाली.परतवाडा, घटांग, धारणी, इंदूर असा आंतरराज्य महामार्ग असून मागील आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावली. रस्त्याच्या कडेवरील नाल्या साफ न केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आहे. ठिकठिकाणी माती व दरडीचा मलबा पडला आहे. या मार्गावर रात्रंदिवस मालवाहू जड वाहतूक सुरू राहत असल्यामुळे इंदूरहून हैदराबाद येथे गहू घेऊन जाणारा एमपी ०९ एचएच ९९१४ हा ट्रक शुक्रवारी रात्री बिहाली ते घटांग दरम्यान घाटात खराब रस्त्यामुळे अपघात होऊन उलटला. तर इंदूरवरून नागपूरकडे जाणारा एमएच ४० बीएल १२९६ क्रमांकाच्या ट्रकला खराब रस्त्याचा फटका बसून तो रस्त्याच्या कडेला उलटला. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर दुर्लक्ष केल्याने मालवाहू वाहनचालक-मालकांमधून संताप व्यक्त होत आहे.आठवडाभरापासून मेळघाटात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे घाटवळणावरील दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा तो मलबा हटविलेला नाही. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात