शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून दोन पर्यटकांना जलसमाधी, पर्यटनासाठी आले होते तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 19:24 IST

पोहण्याच्या नादात गमावला जीव : नागपूर, वर्धा येथून आले होते फिरायला 

ठळक मुद्देवर्धा व नागपूर येथील आठ युवक फिरण्यासाठी आले होते. प्रणव व मंगेश हे दोघेही इतर मित्रांसोबत आंघोळीसाठी तलावात उतरले. अपघाताची मालिका, पर्यटकांचा हुल्लडपणा

चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरायला आलेल्या दोन पर्यटकांचा रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील सक्कर तलावात बुडून मृत्यू झाला. प्रणव भारत गोस्वामी (२३, रा. जरीपटका, नागपूर) व मंगेश रामभाऊ ठाकरे (२४, रा. आंबेडकर नगर, वर्धा) अशी मृतांची नावे आहेत.

वर्धा व नागपूर येथील आठ युवक फिरण्यासाठी आले होते. प्रणव व मंगेश हे दोघेही इतर मित्रांसोबत आंघोळीसाठी तलावात उतरले. त्यांचा गाळात फसून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले, तर दुसऱ्याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मनीष मेंढे, रोशन मारोती कागदे, सौरभ देवानंद खवले, चेतन ढोबळे हे तरुण नागपूर येथून एम एच ३९ पी ५९९३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरण्यासाठी आले होते. सर्व युवक पेंटिंग व इतर रोजंदारीचे कामे करीत असल्याचे सांगण्यात आले. रात्रीचा प्रवास करून पहाटे चिखलदºयात पोहोचले. त्यांनी सक्कर तलावात आंघोळीचा बेत आखला. आंघोळ करीत असताना प्रणव व मंगेश यांना पोहता येत नसल्यामुळे ते तलावातील गाळात फसले. त्यांना बाहेर निघता न आल्याने बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती उपस्थित नागरिकांसह पर्यटकांना दिली. मात्र, प्रयत्न निष्फळ ठरले. चिखलदरा पर्यटन स्थळावरील सक्कर तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. दरम्यान, प्रणय गोस्वामी या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे कार्य वृत्त लिहिस्तोवर सुरू होते. अपघाताची मालिका, पर्यटकांचा हुल्लडपणाचिखलदरा पर्यटन स्थळावर शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. काही पर्यटक हुल्लडपणा आणि पर्यटन स्थळावरील नियमाचे उल्लंघन करतात. त्यामुळे अशा अपघाताला ते बळी पडत असल्याचे वास्तव आहे. मागील आठवड्यात दर्यापूर येथील पर्यटकांची भारधाव कार येथील मालविय पॉइंटवर पुलाखाली कोसळून सात पर्यटक जखमी झाले होते. शनिवारी चिखलदाराहून परत जाणाºया वर्धा येथील पर्यटकांच्या वाहनाला आसेगावनजीक अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला.

सक्कर तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू आहे.- आकाश शिंदे, ठाणेदार, चिखलदरा पोलीस ठाणे

टॅग्स :Deathमृत्यूtourismपर्यटनWaterपाणीPoliceपोलिस