Chikhaldara: शिकारीवरून दोन वाघांची झुंज, एकाचा मृत्यू,मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट जंगलातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 12:48 IST2023-04-30T12:48:25+5:302023-04-30T12:48:43+5:30
Chikhaldara: सांबराची शिकार केल्यावर दोन वाघात झालेल्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील वैराट परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Chikhaldara: शिकारीवरून दोन वाघांची झुंज, एकाचा मृत्यू,मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट जंगलातील घटना
- नरेंद्र जावरे
चिखलदरा- सांबराची शिकार केल्यावर दोन वाघात झालेल्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील वैराट परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अलीकडे भारतात वाघांची संख्या वाढल्याची माहिती असतानाच वैराग येथील दोन वाघांच्या झुंजीत झालेला मृत्यू यासंदर्भात वनाधिकाऱ्यांनी तपास चालविला आहे. वाघाचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती विभागीय वन अधिकारी मनोज कुमार खैरनार यांनी दिली. तर मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर यांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असल्याचे 'लोकमत' अशी बोलताना सांगितले