शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

अमरावतीत दोन हजार लीटर दूधसाठा जप्त, एफडीएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 2:23 PM

बर्फ तयार करण्याच्या लोखंडी पत्र्याच्या डब्यामध्ये दुधाचा बर्फ करण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी दूध साठविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देबर्फ तयार करण्याच्या लोखंडी पत्र्याच्या डब्यामध्ये दुधाचा बर्फ करण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी दूध साठविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.माहितीच्या आधारे अन्न व प्रशासन विभागाने धाड टाकून दोन लीटर दूध जप्त केलं.  

अमरावती : बर्फ तयार करण्याच्या लोखंडी पत्र्याच्या डब्यामध्ये दुधाचा बर्फ करण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी दूध साठविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माहितीच्या आधारे अन्न व प्रशासन विभागाने धाड टाकून दोन लीटर दूध जप्त केलं.  गुरुवारी सातुर्णामधील शिव उद्योग फॅक्टरीमध्ये ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या दुधाचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

कोजागिरी पौर्णिमेला दुधाचा अधिक वापर होत असल्याने मागणी लक्षात घेता अतिरिक्त नफा कमविण्याच्या उद्देशाने विविध दूध डेअरींच्या संचालकांनी विविध पद्धतीने दुधाची साठवण करून ठेवली आहे. त्याचप्रमाणे सातुर्णास्थित एमआयडीसीतील शिव गृहउद्योग येथे तीन दिवसांपासून दूध साठवून ठेवल्याच्या गुप्त माहितीवरून अन्न व प्रशासन विभागाच्या पथकाने धाडी टाकून दोन हजार लीटर दूध जप्त केले आहे. अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार दुधाचे नमुने तपासण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.  

कोजागिरीसाठी शहरात खासगी दूध डेअरींमध्ये मोठ्याप्रमाणात दुधाची साठवण करण्यात आली आहे. भेसळयुक्त व कृत्रिमरीत्या तयार केलेल्या दुधावर एफडीएची नजर असल्याचे वृत्त 'लोकमत'ने गुरूवारच्या अंकात प्रकाशित केले होते. यावर एफडीचे सह. आयुक्त सुरेश अन्नपुरे  व सहाय्यक आयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे व राजेश यादव व इतर पथकाने सातुर्णा परिसरातील शिव गृहउद्योग येथे धाड टाकून अखाद्य बर्फ तयार करण्याच्या ठिकाणी दुधाची साठवण करून ठेवली होती. हा प्रकार नियमाचे उल्लंघन करणारा असून यासंदर्भात तपासणी करण्यात आली.  

दोन हजार लीटर दूधसाठा याची किंमत अंदाजे १ लाख २० हजार रूपये असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. शिव गृहउद्योगचे संचालक गजेंद्र केडीया असून जप्त केलेला दूधसठा देवकी दूध डेअरी, श्रीकृष्ण दूध डेअरी, गांधी चौक, रघुवीर दूध डेअरी गांधी चौक, रूख्मिणी दूध डेअरी चपराशीपुरा, गोपालाकृष्ण दूध डेअरी अंबापेठ, राज दूध डेअरी गांधी चौक आदी  डेअरींचे सदर दूध असल्याची माहिती केडिया यांनी एफडीए अधिकाºयांना दिल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे दुधाची अवैध विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहे.