शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यात दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; शेतकऱ्यांना मिळणार अखंडित वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:26 IST

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

मोहन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून सौरऊर्जा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. डिसेंबर २०२४ ते आजपर्यंत तालुक्यात दहा मेगावॉट क्षमतेचे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांद्वारे अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे राज्यात प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौरऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत वीज उपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसा वीज मिळणार असली तरी पाण्याचा उपसा मर्यादित ठेवण्याची गरज आहे.

असे आहेत प्रकल्पधामणगाव तालुक्यात दाभाडा, नारगावंडी, जुना धामणगाव येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राअंतर्गत ३० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

मंगरूळ, देवगाव परिसरातील शेतकऱ्यांना मिळतेय वीजजळगाव येथून मंगरूळ दस्तगीर उपकेंद्र, तर उसळगव्हाणमधून देवगाव अशा दोन उपकेंद्रांतून निघणाऱ्या कृषी वीज वाहिन्यांवरील अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. दिवसा वीजपुरवठा होत असल्यामुळे शाश्वत शेती करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे पूर्णत्वास आले आहे. महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

"धामणगाव मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती आली आहे. सध्या दोन प्रकल्पांमधून अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे."- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे

"आमच्या भागात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याने आम्हाला दिवसा विजेचा वापर मिळत आहे. आ. प्रताप अडसड यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला ही वीज मिळत आहे."- साहेबराव पाटील, शेतकरी, कावली

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती