दोन झोपड्या खाक; हजारोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:28 IST2019-03-06T22:28:18+5:302019-03-06T22:28:34+5:30

शहरातील गिट्टीखदान येथे बुधवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये हजारोंचे नुकसान झाले आहे.

Two slopes; Loss of thousands | दोन झोपड्या खाक; हजारोंचे नुकसान

दोन झोपड्या खाक; हजारोंचे नुकसान

ठळक मुद्देगिट्टी खदान परिसरात आग : सिरसाम यांच्या घराला तिसऱ्यांदा आग

मोर्शी : शहरातील गिट्टीखदान येथे बुधवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये हजारोंचे नुकसान झाले आहे.
गिट्टीखदान परिसरातील वॉर्ड क्रमांक १४ मधील सय्यद मुस्ताक सय्यद हसन व कमला वसंता सिरसाम यांच्या घराला आगीने वेढले होते. आगीचा धूर आसमंतात पसरल्याने लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. याशिवाय नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशामक दल पोहोचण्यापूर्वीच दोन्ही झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत सय्यद मुस्ताक सय्यद हसन व कमला सिरसाम यांच्या घरातील संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. नगरसेवक नईम, माजी नगरसेविका सुनीता कुमरे, नगरसेवक मनोहर शेंडे, संदीप परतेती, भूषण कोकाटे आदींनी घटनास्थळाला भेट दिली. आगीत किमान ३० ते ३५ हजार रुपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाले. सिरसाम यांच्या घराला आतापर्यंत दोन वर्षाच्या कालावधीत दोन-तीन वेळा आगी लागल्या, हे विशेष.

Web Title: Two slopes; Loss of thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.