दोन क्विंटल गोमांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:30+5:302021-06-03T04:10:30+5:30

शिरखेड पोलिसांची कारवाई, दोघांना अटक शिरखेड : रिद्धपूर येथे गोवंशाची कत्तल करून मांसविक्री करणाऱ्या दोघांना शिरखेड पोलिसांनी मंगळवारी अटक ...

Two quintals of beef seized | दोन क्विंटल गोमांस जप्त

दोन क्विंटल गोमांस जप्त

शिरखेड पोलिसांची कारवाई, दोघांना अटक

शिरखेड : रिद्धपूर येथे गोवंशाची कत्तल करून मांसविक्री करणाऱ्या दोघांना शिरखेड पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून २१० किलो मांस जप्त करण्यात आले. शिरखेडचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी गोपनीय माहितीवरून रिद्धपूर येथील कसाबपुऱ्यातील गोवंशाच्या अवैध कत्तलखान्यावर धाड टाकली. येथून १ लाखी २० हजार रुपयांचे २१० किलो गोमांस तसेच मांस कापण्याकरिता वापरले जाणारे ७३०० रुपयांचे साहित्य जप्त केले तसेच इसराईल खाँ रसूल खाँ (४२) व सद्दाम हुसैन अब्दुल सादीक (२९) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक व मोर्शी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार केशव ठाकरे, अंमलदार मनोज टप्पे, श्यामसिंह चुंगडा, नीलेश देशमुख, अनूप मानकर, छत्रपती करपते, रामेश्वर इंगोले, उमेश कुंभेकर, अमित आवारे, समीर मानकर तसेच पोलीस मुख्यालय येथील दंगा नियंत्रण पथक क्र. ०३ यांनी केली. पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहेत.

Web Title: Two quintals of beef seized