भरधाव बोलेरो पिकअप झाडावर आदळली, दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 16:59 IST2022-01-27T14:06:13+5:302022-01-27T16:59:49+5:30
गुरुवारी पहाटेच्या सुमारास अमरावती-परतवाडा महामार्गावरील आसेगावपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळणीपूर्णा फाट्यानजीक भरधाव बोलेरो पीकअप झाडावर आदळून पलटी झाले. या अपघातात चालकासह इतर एकजण गंभीररीत्या जखमी झाला आहे.

भरधाव बोलेरो पिकअप झाडावर आदळली, दोघे गंभीर जखमी
अमरावती : तुरीचे पोते भरुन जात असलेली भरधाव पीकअप झाडावर आदळून झालेल्या अपघातात वाहनचालकासह अन्य एकजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इर्विन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अमरावती-परतवाडा महामार्गावर घडली.
चालक विनायक गोवर्धन पटवर्धन (रा. कारादा, ता. धारणी) व जितेंद्र देवनारायण पांडे (रा. चाकरदा, ता. धारणी) अशी जखमींची नावे आहेत. ते आज पहाटे साडेपाचच्या सुमारास धारणीहून बोलेरो पिकअपने तुरीचे पोते घेऊन येत होते. दरम्यान, आसेगावपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळणीपूर्णा फाट्याजवळ हे भरधाव पीकअप निंबाच्या झाडावर आदळून पलटी झाले.
अपघाताची माहिती मिळताच आसेगावपूर्णाचे ठाणएदार किशोर तावडे इतर पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी, चालक व त्याचा साथीदार वाहनात अडकले होते. ठाणेदार तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या दोघांना वाहनातून बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात हलवले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.