अमरावतीत १ लाखाची लाच घेताना नगररचना विभागाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By प्रदीप भाकरे | Updated: March 10, 2026 18:39 IST2026-03-10T18:39:10+5:302026-03-10T18:39:44+5:30
Amravati : स्थानिक नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी 5 च्या सुमारास मोठी कारवाई केली.

Two officials of the Town Planning Department caught by ACB while accepting a bribe of Rs 1 lakh in Amravati
अमरावती: स्थानिक नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी 5 च्या सुमारास मोठी कारवाई केली. एका लेआउटवर मंजुरीची पहिली सही (सिक्का) मारण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेताना दोन नगर रचनाकारांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे अमरावतीतील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने त्यांच्या एका लेआउटच्या मंजुरीसाठी नगररचना विभागाकडे अर्ज केला होता. या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कार्यालयात सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.