जिल्ह्यात डेंग्यूने पुन्हा दोन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST2021-09-10T04:18:46+5:302021-09-10T04:18:46+5:30

युवकाच्या मृत्यूने तिवसा हादरले, बडनेऱ्यात १८ वर्षीय मुलगी दगावली तिवसा, बडनेरा : तिवसा नगरपंचायत क्षेत्रात डेंग्यूचा चांगलाच प्रकोप सुरू ...

Two more deaths from dengue in the district | जिल्ह्यात डेंग्यूने पुन्हा दोन मृत्यू

जिल्ह्यात डेंग्यूने पुन्हा दोन मृत्यू

युवकाच्या मृत्यूने तिवसा हादरले, बडनेऱ्यात १८ वर्षीय मुलगी दगावली

तिवसा, बडनेरा : तिवसा नगरपंचायत क्षेत्रात डेंग्यूचा चांगलाच प्रकोप सुरू आहे. गुरुवारी सकाळी एका युवकाचा मृत्यू झाला. पाच दिवसांत तिघांना या आजाराने गाठले. त्यामुळे तालुक्याला हादरा बसला आहे.

संदीप शरद खाकसे (३१, रा. लुंबिनीनगर, तिवसा) या युवकाचा गुरुवारी सकाळी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात डेंग्यूने मृत्यू झाला. संदीपला चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात आतापर्यंत सहा जणांना डेंग्यूने मृत्यू झाला आहे.

बडनेरा येथे नव्यावस्तीतील अशोकनगरात १८ वर्षीय तरुणीचा डेंग्यूने बुधवारी उशिरा रात्री मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. प्रियंका सतीश सहारे (१८) मृताचे नाव आहे. ती चार ते पाच दिवसांपासून आजारी होती. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास खासगी लॅबकडून प्राप्त झालेला डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे उपचार करीत असलेल्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून समजले. मात्र, अकोला येथील शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झालेला नाही. तिच्या पश्चात आई, वडील व भाऊ आहे.

Web Title: Two more deaths from dengue in the district