आणखी दोन दिवस शीतलहर नव्या वर्षाचे स्वागत पावसाने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:32+5:30
सध्या उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असल्याने तसेच मध्य प्रदेशवर १.५ किमी उंचीवर वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे ती थंड हवा महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. त्यामुळे विदर्भात सध्या थंडीची लाट आहे. एक पश्चिमी चक्रवात (विक्षोभ) हिमालय तसेच मध्यभारतासह उत्तर भारताला बाधित करण्याची शक्यता आहे.

आणखी दोन दिवस शीतलहर नव्या वर्षाचे स्वागत पावसाने!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सध्या दक्षिणपूर्व अरबी समुद्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र तथा चक्राकार वारे थोडे पश्चिमेकडे सरकलेले आहेत. त्यामुळे सध्याचे पावसाळी वातावरण निवळले असले तरी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली.
सध्या उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असल्याने तसेच मध्य प्रदेशवर १.५ किमी उंचीवर वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे ती थंड हवा महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. त्यामुळे विदर्भात सध्या थंडीची लाट आहे. एक पश्चिमी चक्रवात (विक्षोभ) हिमालय तसेच मध्यभारतासह उत्तर भारताला बाधित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीमध्ये विदर्भात बरेच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गाारपीट देखील होऊ शकते असे बंड म्हणाले. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पूर्वेकडून वाहणारे बाष्पयुक्त वाºयाची मध्यभारतात टक्कर होण्याची शक्यता ३० डिसेंबरनंतर असल्यामुळे मध्य भारतात वादळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
वायव्य भारतात वारे वायव्येकडून वाहत असल्याने व अन्य हावामान शास्त्रीय परिस्थिती अनुकूल असल्याने पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश व अन्य ठिकाणी सध्या थंडीची लाट व दाट धुके आहेत. एक-दोन दिवसांत बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश व लगतच्या परिसरात हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. सध्या दिवसाचे तापमान घसरले आहे. शनिवारी सकाळी तापमान ११ अंशापर्यंत होते. त्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या, तर शहरात उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहे. अचानक वातावरण बदलामुळे सर्दी पडसा, खोकला व विषणुजन्य आजारांत वाढ झालेली आहे.
कपाशी, तुरीचे नुकसान
गत आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. चार दिवसांत बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कापूस ओला झाला तसेच जमिनीत आर्द्रता वाढत असल्याने हंगाम लांबणार व यामुळे पुन्हा बोंड अळीचे चक्र खंडित न झाल्यामुळे पुढील वर्षी पुन्हा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचा हंगाम वाढऊ नये, तसेच यासाठीचे एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले.