क्वारंटाईन सेंटरवर रमल्या दोन चिमुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:01:22+5:30

एप्रिलमध्ये पालकांसमवेत या दोन्ही चिमुकल्या मुली नागपूर येथे लग्नाला गेल्या होत्या. यादरम्यान लॉकडाऊनमुळे त्या तेथेच अडकल्यात. परत येण्याचे सर्व प्रयत्न केल्यानंतर त्या आपल्या पालकांसमवेत नागपूरवरून पायीच निघाल्यात. पुढे टोल नाक्यावर त्यांना कांदे वाहून नेत असलेल्या वाहनात बसून त्यांनी अचलपूर गाठले. प्रशासनाने त्यांना शहरातील म्युनिसीपल हायस्कूलमधील क्वारंटाइन सेंटरवर १९ मे रोजी दाखल केले.

Two little girls at the quarantine center | क्वारंटाईन सेंटरवर रमल्या दोन चिमुकल्या

क्वारंटाईन सेंटरवर रमल्या दोन चिमुकल्या

googlenewsNext
ठळक मुद्देएक केजी-वनची, दुसरी तिसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी; शिक्षकांनाही लागला लळा

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : तोंडाला मास्क आणि सामाजिक अंतर ठेवत कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक सर्व नियमांचे पालन करणाºया दोन चिमुकल्या पºया चिमुकल्या क्वारंटाइन सेंटरवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यातील एक केजी-वनची, तर दुसरी तिसºया वर्गाची विद्यार्थिनी आहे. बाहेरगावाहून आल्याने त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. त्या या सेंटरवर रमल्या आहेत.
एप्रिलमध्ये पालकांसमवेत या दोन्ही चिमुकल्या मुली नागपूर येथे लग्नाला गेल्या होत्या. यादरम्यान लॉकडाऊनमुळे त्या तेथेच अडकल्यात. परत येण्याचे सर्व प्रयत्न केल्यानंतर त्या आपल्या पालकांसमवेत नागपूरवरून पायीच निघाल्यात. पुढे टोल नाक्यावर त्यांना कांदे वाहून नेत असलेल्या वाहनात बसून त्यांनी अचलपूर गाठले. प्रशासनाने त्यांना शहरातील म्युनिसीपल हायस्कूलमधील क्वारंटाइन सेंटरवर १९ मे रोजी दाखल केले. तेव्हापासून या दोन्ही चिमुकल्या या क्वारंटाईन सेंटरवर हसत, खेळत, बागडत वास्तव्यास आहेत. या चिमुकल्यांनी सेंटरवरील मुख्याध्यापकांसह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही लळा लावला आहे. शिक्षकांनी त्यांना खेळण्याकरिता रिंग आणि दोरी उपलब्ध करून दिली आहे. दोरीवरच्या उड्या मारीत शाळेतील घसरगुंडीसह खेळण्याच्या अन्य संसाधानांचा त्या वापर करीत आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने शाळा बंद ठेवल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची ये-जा नाही. किलबिलाट तर दोन महिन्यांत ऐकू आलेला नाही. अशात शाळेच्या आवारातील या चिमुकल्यांच्या मुक्त संचाराने, खेळण्या-बागडण्याने परत एकदा अल्प प्रमाणात का होईना, शाळेत किलबिलाट बघायला मिळत आहे.
दरम्यान, लॉकडाऊन अडकून पडल्यानंतर कांद्याच्या गाडीतून घडलेल्या प्रवासाचे वर्णन करताना, त्या गाडीवाल्याने आमच्याकडून पैसे घेत नाहीत, असेदेखील त्या मोठ्या अभिमानाने सांगतात.

देवाघरची फुले
कोरोना विषाणूच्या संकटाने मनुष्यजातीला चांगलाच हादरा दिला आहे. त्याच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी क्वारंटाइन केंद्रात ठेवले आहे, एवढेच देवाघरची फुले ही उपमा लाभलेल्या या चिमुकल्यांना माहिती आहे. त्यांचे बोलणे, स्वच्छंद बागडणे क्वारंटाइन केंद्रावर असलेल्या सर्वांना भावले आहे. त्या लवकरात लवकर आपल्या घरी जाव्यात, अशी सदिच्छा सर्व जण व्यक्त करतात.

Web Title: Two little girls at the quarantine center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.