भातकुली तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST2021-01-20T04:14:06+5:302021-01-20T04:14:06+5:30
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये समावेश असलेल्या साऊर ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसप्रणीत ग्रामविकास पॅनेलचे १० उमेदवार निवडून आले. या ...

भातकुली तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायती
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये समावेश असलेल्या साऊर ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसप्रणीत ग्रामविकास पॅनेलचे १० उमेदवार निवडून आले. या १३ सदस्यीय ग्रामपंचायतींमधील विजयी उमेदवारांमध्ये श्रीकांत बोंडे, अनिता सावरकर, राजेंद्र राहाटे, रियाझ खान पठाण, प्रदीप गौरखेडे, रोहिणी माहुरे, सुनीता चव्हाण, दिलीप चव्हाण, अनिता घरडे, दीपाली बिजवे यांचा समावेश आहे. न्यू ग्रामविकास पॅनलचे शशांक ततंरपाळे, मयूरी भुयार व रत्ना सोळंके विजयी झाले. विजयी सदस्यांवर भाजप व काँग्रेसने दावा केला आहे.
---------------------
फोटो पी १९ वाठोडा
वाठोड्यात परिवर्तन पॅनेलची सरशी
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील सर्वात मोठ्या १५ सदस्यीय वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायतीमध्ये ८ सदस्यीय परिवर्तन पॅनेलची सरशी झाली. तर, राकाँ समर्थित ग्रामविकास पॅनेलला सात जागा मिळाल्या. सेना काँग्रेससमर्थित परिवर्तन पॅनेलच्या विजयी उमेदवारांमध्ये बाबाराव मागे, सुमैय्या परवीन अलिमुद्दिन, जाकीरा बी अहेमद खान, सुवार्ता थोरात, खुर्शीद बानो मोहम्मद सुबान, मोहम्मद रिजवान अब्दुल गफार, माया बुरघाटे व उषा खंडारे यांचा समावेश आहे. तर ग्राम विकास पॅनलचे उमेश घुरडे, श्याम चहाकार, सविता बुरघाटे, लिखित चांदूरकर, प्रज्वल यावले, सारिका वाठ व दीपक जंजाळ निवडून आले.
----------------------