दोन गटात मारहाण, पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:20+5:30

क्षुल्लक कारणावरून घरात शिरून वृद्धेला थापड मारली. म्हणून दोन गटांत मारहाण झाली, याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांवरच दोन्ही गटांतील ३० ते ४० जणांनी दगडफेक करून जीवघेणा हल्ला चढविला. यात एका पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री दरम्यान बेलपुऱ्यात घडली.

Two groups beaten, police stoned | दोन गटात मारहाण, पोलिसांवर दगडफेक

दोन गटात मारहाण, पोलिसांवर दगडफेक

ठळक मुद्देबेलपुऱ्यातील घटना : पीआयसह दोन कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : क्षुल्लक कारणावरून घरात शिरून वृद्धेला थापड मारली. म्हणून दोन गटांत मारहाण झाली, याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांवरच दोन्ही गटांतील ३० ते ४० जणांनी दगडफेक करून जीवघेणा हल्ला चढविला. यात एका पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री दरम्यान बेलपुऱ्यात घडली.
दगडफेकीत पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर पोलीस जमादार राजेश राठोड, पोलीस शिपाई संतोष विघे हेसुद्धा जखमी झाले. पोलिसांवर दोन्ही गट एकत्र येऊन दगडफेक केल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, एसीपी सुहास भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह दंगा नियंत्रण पथक, क्यूआरटी पथक, तसेच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व आरोपींना तातडीने अटक केली. फिर्यादी पोलीस जमादार राजेश राठोड यांच्या तक्रारीवरून दगडफेकीतील आरोपी सागर तंबोले (२८), राज तंबोले (३१), ऋतिक तंबोले (२०), शुभम तंबोले (२१), विजू तंबोले (४३), शिवा तंबोले (२३), शंकर मदने (३८), अमित धनाडे, शुभम धनाडे (२०), जुगल मदने (२१), जितू तंबोले (२५), गोपाल माहुरे (४४), श्याम तंबोले (५१), रामेश्वर माहुलकर (५९), अशोक तंबोले (४८)सह ३० ते ४० जणांवर पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३५३, ३३२, ३३३, ५०४, ५०६, १८८, २६९, सहकलम १३५, (मपोका)नुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे करीत आहे.
फिर्यादी २० वर्षीय मुलगी (रा. बेलपुरा) यांच्या तक्रारीवरून आरोपी अमोल महादेव माहुरे (३८), संजय महादेव माहुरे (४३, सर्व रा. बेलपुरा) विरुद्ध भादंविच्या कलम ३२३, २९४, ४४८ अन्वये गुन्हा नोंदविला. घरात शिरून अश्लील शिवीगाळ करून वृद्धेला थापड मारल्याची तक्रार फिर्यादीने नोंदविली. दुसºया गटातील जखमी फिर्यादी अमोल महादेवराव माहुरे (रा. बेलपुरा) यांच्या तक्रारीवरून आरोपी गजानन मन्साराम मदने, शंकर मन्साराम मदने, जुगल गजानन मदने, अमित दिलीप धनाडे, शुभम दिलीप धनाडे, ऋतिक रवि मंडवे (सर्व रा. बेलपुरा) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९, १८८, २६९ अन्वये गुन्हे नोंदविले. फिर्यादीसोबत नालीच्या कारणावरून सकाळी वाद झाला होता.
पोलिसांत तक्रार का दिली या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपीने फिर्यादीला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

संचारबंदीतही दगडफेक
'लॉकडाऊन' व संचारबंदी असतानाही राडा झाल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले असून, रात्रभर आरोपींना धरपकड करणे सुरू होते. आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आले आहे. सोमवारी रात्री घटनास्थळावर दोन पोलीस उपनिरीक्षक व आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Web Title: Two groups beaten, police stoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस