दोन ग्रामपंचायतींमध्ये तीन जाागांसाठीच होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:40+5:302021-01-13T04:32:40+5:30
असा्ईनमेंट डमी पी १२ ग्रामपंचायत नावाने अमरावती : कोरोनाकाळातही ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान जोरात आहे. गावागावांतील पुढाऱ्यांचे राजकीय वर्चस्व पणाला ...

दोन ग्रामपंचायतींमध्ये तीन जाागांसाठीच होणार मतदान
असा्ईनमेंट
डमी पी १२ ग्रामपंचायत नावाने
अमरावती : कोरोनाकाळातही ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान जोरात आहे. गावागावांतील पुढाऱ्यांचे राजकीय वर्चस्व पणाला लागले आहे. मात्र, १३ अविरोध ग्रामपंचायती व ४७३ बिनविरोध सदस्य वगळता ५५३ पैकी ५३७ ग्रामपंचायतींमध्ये ४४१६ उमेदवारांसाठी १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे. यात केवळ दोन तालुक्यांतील दोन सात सदस्यीय ग्रामपंचायतींमध्ये तीन जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे, अन्यथा उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये सर्वच जागांवर उमेदवार रिंगणात असून अटीतटीची लढत होणार आहे.
गावागावातील सामाजिक सौहार्द कायम राहावा, निवडणुकीदरम्यान कटुता येऊ नये म्हणून राजकीय मुरब्बी ग्रामपंचायत अविरोध करण्यावर भर देतात. मात्र, यंदा १३ ग्रामपंचायती वगळता अन्य ठिकाणी ते साध्य होऊ शकले नाही. ४७३ सदस्य बिनविरोध निवडून आले असले तरी उर्वरित ४९०३ पैकी ४४१६ ठिकाणी निवडणूक होत आहे. यात एक ते दोन जागांसाठी कुठेही मतदान होऊ घातले नाही. तेथील संपूर्ण जागांसाठी अथवा एकूणपैकी ७५ टक्के जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. एक ते दोन जागांसाठी मतदान होऊ घातले आहे, अशी एकही ग्रामपंचायत जिल्हयात नाही.
दरम्यान, चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा बु. येथील चार जागा अविरोध झाल्या, तर तेथे तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. चांदूर बाजार तालुक्यात थुगाव पिंपरी येथे एकूण सात उमेदवारांपैकी तार उमेदवार अविरोध निवडून आल्याने एका प्रभागातील तीन सदस्यपदांकरिता निवडणूक होणार आहे.
बॉक्स
५३७ : निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती
०० : एक दोन जागांसाठी निवडणूका होत असलेल्या ग्रापं
----------
किती जण बिनविरोध?
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित झाली. प्रक्रियेदरम्यान माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी एकच वैध उमेदवारी अर्ज उरल्याने तब्बल ४७३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता एकूण ४४१६ सदस्यांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. ४७३ अविरोध उमेदवारांमध्ये अमरावती तालुक्यातील ३०, भातकुली ४२, नांदगाव ५६, दर्यापूर २२, अंजनगाव सुर्जी ३२, तिवसा १५, चांदूर रेल्वे १६, धामणगाव रेल्वे २९, अचलपूर ५७, चांदूर बाजार ४१, मोर्शी ३८, वरूड १४, धारणी ४६ व चिखलदरा तालुक्यातील ३५ सदस्यांचा समावेश आहे.
-----