दुचाकीचोरांच्या दोन टोळ्या गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:20+5:30

दुचाकीचोरांच्या दोन टोळ्यातील तीन आरोपींना कोतवाली पोलिसांनी रविवारी अटक केली. बंटी ऊर्फ अजय पद्माकर मेश्राम (१९), रोशन ऊर्फ पाया श्रीधर काकडे (१९) आणि साहिल इसराईल शहा (२५, सर्व रा. घुईखेड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. न्यायालयाने सोमवारी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Two gangs of bicyclists arrested | दुचाकीचोरांच्या दोन टोळ्या गजाआड

दुचाकीचोरांच्या दोन टोळ्या गजाआड

ठळक मुद्देनऊ दुचाकी जप्त : कोतवाली पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुचाकीचोरांच्या दोन टोळ्यातील तीन आरोपींना कोतवाली पोलिसांनी रविवारी अटक केली. बंटी ऊर्फ अजय पद्माकर मेश्राम (१९), रोशन ऊर्फ पाया श्रीधर काकडे (१९) आणि साहिल इसराईल शहा (२५, सर्व रा. घुईखेड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. न्यायालयाने सोमवारी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नांलदा विहार येथील रहिवासी राजेश लक्ष्मण जांभुळकर (५७) यांची एमएच ३१ ईव्ही ८४४८ क्रमांकाची दुचाकी २४ नोव्हेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथून चोरीला गेली होती. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासकामी असताना कोतवाली पोलिसांच्या दोन पथकाने तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एमएच २७ बीएच ५५९३, एमएच २७ एई ३१९७, एमएच २७ एल ५११, एमएच २७ क्यू ४८२९, एमएच २७ एजे ६५७४, एमएच २७ एजी ९५२४, एमएच ३७, एच ५०१२ आणि अन्य एक अशा नऊ दुचाकी (३ लाख १५ हजार) पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अब्दुल कलाम, मनीष सावरकर, गजानन ढेवले, विनोद मालवे, अमोल यादव आणि सागर ठाकरे यांनी ही कारवाई केली. याशिवाय कोतवालीचे पीएसआय गजानन राजमलू, एएसआय राजेंद्र उमक, नीलेश जुनघरे, आशिष विघे, इम्रान खान आणि जुनेद खान यांच्या पथकाने या टोळीतील दोन दुचाकी चोरांना जेरबंद केली.

अंमली पदार्थाच्या तस्करीशी जुळले तार
दोन आरोपी हे तेलगंणा येथून चारचाकी वाहनाने अमरावतीपर्यंत अंमली पदार्थ आणत असल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. अंमली पदार्थाची खेप आणल्यानंतर ते शहरात दुचाकी चोरी करीत होते.

प्रतिज्ञापत्रवर लिहून दुचाकींची विक्री
दोन चोर हे दुचाकी विक्री करताना संबंधित खरेदीदाराला प्रतिज्ञापत्र लिहून देत होते. शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर विक्री व खरेदीदाराचे नाव लिहिणे, घेतलेली रक्कम टाकणे आणि उर्वरित रक्कम घेण्याचा उल्लेख करीत होते.

Web Title: Two gangs of bicyclists arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर