शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात एकाच मृत्यू तर दुसरा गंभीर; भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 17:38 IST

Accident : रहाटगाव येथील घटना

ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच मनोजच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. नांदगाव पेठ पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.  मनोज आणि ऋषीकेश हे दोघेही सोमवारी सकाळी एमएच २७ एस ९८५७ या दुचाकीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात आले होते.

नांदगाव पेठ : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात एक जण जागीच ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील चारचाकी वाहनाच्या शोरूमसमोर घडली. 

रुग्णालयातून घरी परतताना दोन मित्रांवर काळाने घाला घातला. मनोज राजाभाऊ ढबाळे, असे मृत तरुणाचे, तर ऋषिकेश दादाराव घाटोळ, असे जखमीचे नाव आहे. दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मनोज आणि ऋषीकेश हे दोघेही सोमवारी सकाळी एमएच २७ एस ९८५७ या दुचाकीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात आले होते. रुग्णालयाचे काम झाल्यानंतर ते वाठोडा खुर्द येथे परत जात असताना दुपारी ३ वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील एका कार शोरूमजवळ ओ.डी.१५ एन ७९५५ या १८ चाकी मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिली. दुचाकीसह मनोज ट्रकच्या मागील चाकात आल्याने त्याचा चेहरा चेंदामेंदा झाला. तो जागीच ठार झाला. मागे बसलेला ऋषिकेश गंभीररीत्या जखमी झाला. घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांचेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. जखमी ऋषीकेशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मनोजच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. नांदगाव पेठ पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.  

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावतीDeathमृत्यूtwo wheelerटू व्हीलर