बडनेरा ठाण्यातील दोन चार्ली कमांडो निलंबित

By Admin | Updated: August 4, 2015 00:01 IST2015-08-04T00:01:13+5:302015-08-04T00:01:13+5:30

माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याने बडनेरा पोलीस ठाण्याच्या दोन चार्ली कमांडोवर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Two Charlie commandos suspended in Badnera Thane | बडनेरा ठाण्यातील दोन चार्ली कमांडो निलंबित

बडनेरा ठाण्यातील दोन चार्ली कमांडो निलंबित

आयुक्तांची कारवाई : पैसे घेणे महागात पडले
अमरावती : माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याने बडनेरा पोलीस ठाण्याच्या दोन चार्ली कमांडोवर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रावर अंकुश लावण्यासाठी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या आदेशाने शहरात चार्ली कमांडोंची गस्त सुरु झाली आहे. बडनेरा पोलीस ठाण्याचे चार्ली कमांडो हरीश गाडवे (बं.न. १३१२) व नितीन गावंडे (बं.न. २१६) हे दोघेही जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दुचाकीने जुना जकात नाक्याजवळील बायपास मार्गावर गस्त घालत होते. मार्गावरील ट्रक थांबवून त्यांची चौकशी करण्याचे काम दोघेही करीत होते. याचवेळी त्यांनी मालवाहतूक वाहनधारकांकडे पैशांची मागणी केली.

Web Title: Two Charlie commandos suspended in Badnera Thane