दोन कारची धडक, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:46+5:302021-08-27T04:17:46+5:30
चांदूर रेल्वे : सातेफळ फाटा ते राजना फाटा दरम्यान बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात ...

दोन कारची धडक, चार जखमी
चांदूर रेल्वे : सातेफळ फाटा ते राजना फाटा दरम्यान बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, फिर्यादी शेख समीर शेख समद (२३, रा. काजीपुरा, चांदूर रेल्वे) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ ऑगस्टला दुपारी १२ च्या सुमारास त्याने चांदूर रेल्वे येथील मित्राची चारचाकी (एमएच १९ एपी ४८५४) घेतली व मामा, मामी व मामेबहीण (सर्व रा. काजीपुरा) यांच्यासह यवतमाळ येथे नातेवाइकाकडे गेले. परत येत असताना रात्री ९.३० च्या सुमारास सातेफळ फाटा ते राजना फाटा दरम्यान चांदूर रेल्वेकडून एमएच २९ बीसी ३४४९ क्रमांकाची चारचाकी उजव्या बाजूला धडकली. त्यामुळे शेख समीरची कार नालीमध्ये गेली. दुसरी चारचाकी उलटली. अपघातात शेख समीरच्या मामा व मामी यांच्या डोक्याला मार लागला तसेच दुसऱ्या कारमधील दोघे जखमी झाले. ठाणेदार मगन मेहते यांनी एमएच २९ बीसी ३४४९ क्रमांकाच्या चारचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
चांदूर रेल्वे ते तळेगाव दशासर रस्त्याचे एकाच बाजूचे काम पूर्ण झाले. दुसऱ्या बाजूचे खोदकाम केले आहे. येथे दिशादर्शक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
260821\img-20210826-wa0023.jpg
photo