चांदूरबाजारात दोन एटीएम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:01:22+5:30

बेलोरा टी-पॉइंट परिसरातील दोन एटीएम फोडण्यात आले. मात्र, आरोपींच्या हाती त्यातील रोकड पडली नाही. सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या चार ते पाच तासांत आरोपींना जेरबंद करण्यात आले. एटीएम फोडल्याची घटना सोमवारी पहाटे २.१५ ते २. ४५ या कालावधीत घडली. स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

Two ATMs burst into Chandur Bazar | चांदूरबाजारात दोन एटीएम फोडले

चांदूरबाजारात दोन एटीएम फोडले

ठळक मुद्देचार तासांत आरोपी गवसले : सीसीटीव्ही फुटेजने सोडविला गुंता

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : येथील बेलोरा टी-पॉइंट परिसरातील दोन एटीएम फोडण्यात आले. मात्र, आरोपींच्या हाती त्यातील रोकड पडली नाही. सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या चार ते पाच तासांत आरोपींना जेरबंद करण्यात आले. एटीएम फोडल्याची घटना सोमवारी पहाटे २.१५ ते २. ४५ या कालावधीत घडली. स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. महेश अर्जुन मानापुरे (२४, रा. गोकुळनगर, चांदूर बाजार) व दिगांबर जगनराव लांडगे (३२, रा. कोळविहीर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
बेलोरा टी-पॉइंट परिसरातील महाराष्ट्र बँक व बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम फोडून यातील आरोपी पसार झाले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पथक चांदूर बाजारला रवाना झाले. त्यानंतर जिल्ह्यात एटीएम फोडणाऱ्या आरोपीचे वर्णन व वाहनाबाबत माहिती देऊन नाकाबंदी करण्यात आली. चांदूर बाजार येथील एटीएम फोडून पसार झालेल्या आरोपींची सीसीटीव्हीमधील फुटेजमधून मिळविलेली छायाचित्रे सोशल मिडीयाद्वारे पोलीस ग्रुपवर पाठविण्यात आली.
दरम्यान, मोर्शी येथील रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी जयस्तंभ चौकातील एसबीआय एटीएम परिसरात फुटेजमधील आरोपींपैकी एकाला तो चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून दुसरा आरोपी कोळविहीर येथून स्थानिक गुन्हे शाखा व शिरखेड पोलिसांनी ताब्यात घेतला.
महेश मानापुरे व दिगंबर लांडगे यांच्याकडून ५३,५०० रुपये रोख, एक लोखंडी टॉमी, प्लास्टिक टेब, पेन्चिस व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ५३ हजार ७५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मोर्शी व शिरखेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघड केला.

यांनी केले चोरांना गजाआड
पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. व अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे, मोर्शीचे ठाणेदार संजय सोळंके, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, नरेंद्र पेंदोर, केशव ठाकरे, हेमंत चौधरी, उपनिरीक्षक आशिष चौधरी, सहायक उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर, गणेश मांडोकर, वासुदेव नागलकर, हेकॉ मनोहर, सुनील तिडके, शेख शकुर, लक्ष्मीकांत देशमुख, अरविंद लोहकरे, गजेंद्र ठाकरे, योगेश सांबारे, प्रवीण अंबाडकर, युवराज मानमोठे, अमित वानखडे, नितेश तेलगोटे, दिनेश कनोजिया, अमोल केंद्र, मनोज शेंडे, वैभव देशमुख, किरण गावंडे व होमगार्ड अण्णा मेश्राम हे या कारवाईत सहभागी झाले.

Web Title: Two ATMs burst into Chandur Bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर