शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

अडीच हजार झाडांची होणार कापणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास अमरावती शहरातील नागपुरी गेट येथील उड्डाणपुलापासून सुरुवात होत आहे. परतवाडा शहराबाहेर मल्हारा-धारणी मार्गावरील बुरडघाटपर्यंत हा रस्ता होत आहे. या मार्गावरील प्रत्येक गावालगत काही अंतर सिमेंट काँक्रीटीकरण आणि गाव सोडून पुढील आणि मागील रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देअमरावती-परतवाडा मार्ग : ५८ किमी अंतरात तोडलेल्याच्या तिप्पट वृक्ष लावली जाणार

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अमरावती-परतवाडा या ब्रिटिशकालीन मार्गाचे चौपदरीकरण करण्यास एशियन डेव्हलमेंट बँक (एडीबी) ने तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर या कामात रस्त्याच्या दुतर्फा असलेली अडीच हजारांहून अधिक मोठी झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गाची दाट सावली हिरावणार आहे.५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास अमरावती शहरातील नागपुरी गेट येथील उड्डाणपुलापासून सुरुवात होत आहे. परतवाडा शहराबाहेर मल्हारा-धारणी मार्गावरील बुरडघाटपर्यंत हा रस्ता होत आहे. या मार्गावरील प्रत्येक गावालगत काही अंतर सिमेंट काँक्रीटीकरण आणि गाव सोडून पुढील आणि मागील रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. सहाशे कोटींहून अधिक खर्च या रस्त्यावर केला जाणार आहे. यात भूसंपादनाची कुठलीही तरतूद नाही. उपलब्ध मार्गाचे उपलब्ध जागेवरच चौपदरीकरण होणार आहे. या ब्रिटिशकालीन मार्गाला १९६७ मध्ये सर्वप्रथम राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला. आता चौपरीकरणानंतर तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वेक्षण करुन विकास आराखडाही मंजूर केला तसेच हा रस्त्या एडीबीकडे वर्ग केला. भोपाळ येथील कंपनीकडून या रस्त्याचे सर्वेक्षण झाले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची, प्रस्तावाची पाहणी करून काही बदल सुचविले आहेत. महाराष्ट्र-मध्य प्रदेश असा हा आंतरराज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून नावरूपास येणार आहे.ब्रिटिशकालीन तीन पूलशंभर-सव्वासे वर्षांहून अधिक जुन्या या मार्गावर वलगावजवळ पेढी नदीवर, आसेगाव येथील पूर्णा नदीवर व भुगावजवळीत पिली नदीवर पूल आहे. त्यांचे अस्तित्व चौपदरीकरणात कायम राहणार आहे.कडुनिंबाची झाडे इतिहासजमाया मार्गावर स्त्याच्या दुतर्फा मोठी, जुनी शेकडो कडुनिंबाची झाडे आहेत. यातील काही झाडे शंभर वर्षाहून अधिक वयाची आहेत. अमरावतीहून निघाल्यानंतर परतवाड्यापर्यंत ही शेकडो कडुनिंबाची हिरवीगार झाडे प्रवाशांच्या आरोग्यासह पर्यावरणासही पोषक ठरली. पण आता या मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याने ती तोडली जाणार आहेत. यामुळे ही झाडे इतिहासजमा होणार आहेत.या रस्त्याच्या कामात अडीच हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. पण, त्याच्या मोबदल्यात तोडल्या जाणाºया झाडांच्या तिप्पट वृक्ष मार्गाच्या दुतर्फा लावले जाणार आहेत. या रोपांचे झाडांचे संरक्षण व संवर्धन पुढील तीन वर्षे संबंधित यंत्रणेलाच करावे लागणार आहे.-विजय वाट, उपविभगीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर

टॅग्स :forestजंगल