शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

जिल्ह्यात अडीच हजार शाळा होणार सुरू शहरात आठवी, ग्रामीणमध्ये पाचवीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 5:00 AM

शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे. दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून कायम राहणार असल्याने पालकांचेही टेन्शन वाढले आहे. कधी हा कोरोना जातो, असे त्यांना झाले आहे. 

धीरेंद्र चाकोलकर लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागात पाचवीपासून, तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्याचे शासनाचे आदेश धडकताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदच व्यक्त करण्यात आला. कारण दोन वर्षांपासून ‘ढकलगाडी’ने वरच्या वर्गात जात असले तरी त्यांच्या जिवाभावाचे सोबती, वर्गमित्र यांची भेट दुरावली होती. शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे. दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून कायम राहणार असल्याने पालकांचेही टेन्शन वाढले आहे. कधी हा कोरोना जातो, असे त्यांना झाले आहे.  

पालकांची संमती आवश्यक शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य केलेली नाही. शालेय साहित्याव्यतिरिक्त केवळ मास्क, सॅनिटायझर हेच शाळेत आणण्याची परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त संक्रमणाचे साधन होऊ शकणाऱ्या वस्तू टाळण्याचे निर्देश आहेत. 

शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्या दिशेने तयारी होत आहे. पालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागात पाचवीपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.  - ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी

माझा मुलगा पाचवीनंतर आता थेट सातवीत शाळेत जाईल. मध्यंतरी घरीच राहत असल्याने त्याला मजुरांअभावी शेतीची कामात कामात सोबत घ्यावे लागले. आता तो शिक्षणासाठी कष्ट घेईल. त्यासाठी शालेय साहित्यासह मास्क, सॅनिटायझर घेतले आहे.  विजय बोरकर, काजना

कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे शहरी भागातदेखील पाचवीपासून शाळा सुरू व्हायला हवी होती. मुले आता ऑनलाईन क्लास आणि ट्यूशनच्या भरवशावर जेवढा होईल तेवढा अभ्यास करतात. मात्र, त्यांना कितपत समजते, हे कळणे अशक्य आहे. आता शाळा बंद राहण्यास दोन वर्षांचा कालावधी लोटला. या कालावधीत मित्र दुरावले. मोबाईलमुळे मुलांमध्ये एकांगी अवस्था आली आहे.अजय भगत, साईनगर

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या