अत्याचार प्रकरणाच वीस वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:48+5:302021-08-27T04:17:48+5:30
परतवाडा : शेतातील झोपडीत झोपलेल्या आदिवासी दाम्पत्याला मारहाण व महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिचे अपहरण करणाऱ्या दोन नराधमांना अचलपूर येथील ...

अत्याचार प्रकरणाच वीस वर्षे सश्रम कारावास
परतवाडा : शेतातील झोपडीत झोपलेल्या आदिवासी दाम्पत्याला मारहाण व महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिचे अपहरण करणाऱ्या दोन नराधमांना अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायाधीश क्रमांक १ एम.एच. पठाण यांच्या न्यायालयाने गुरुवारी २० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
विधी सूत्रांनुसार, प्रेमलाल रायसिंग धुर्वे (३४, रा. सालेढाणा, ता. भैसदेही, हल्ली मु. करजगाव), पूरणलाल सखरू धुर्वे (४६, रा. गारपठार, मध्यप्रदेश हल्ली मु. खरपी) अशी शिक्षा ठोठावलेल्या दोन्ही नराधमांची नावे आहेत. ९ एप्रिल २०१६ रोजी पहाटे ४ वाजता पीडिता पतीसह झोपली असताना दोन अनोळखी इसमांनी दाराला लाथा मारून दरवाजा तोडला व खोलीमध्ये प्रवेश करून पतीला विळ्याने हातावर वार करून जखमी केले. पीडितेला शेतात नेऊन अत्याचार केला आणि दुचाकीवर बसवून पळवून गेले. घटनेचा तपास शिरजगाव कसबाचे सहायक पोलीस निरीक्षक एस.के. फरकाडे यांनी करून दोषारोपपत्र अचलपूर न्यायालयात सादर केले होते. सहायक सरकारी अभियोक्ता ॲड.. डी.ए. नवले यांनी न्यायालयासमोर एकूण १० साक्षीदार तपासले. पीडिताचे बयाण वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगाधर पांडुरंग अतराम व नायब तहसीलदार हरीश राठोड यांचा साक्ष पुरावा ग्राह्य धरला. शिरजगाव कसबा ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पैरवी प्रमोद शिंपी, दीपक दलाल यांनी केली.