शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

श्वानाच्या छातीला ८७० ग्रॅमचा ट्युमर, वसा संस्थेत केली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 12:06 AM

प्राणिप्रेमी सुवर्णा देवघरे आणि विद्याप्रकाश चांडक यांच्या माहितीनुसार, सराफा बाजार परिसरातून वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू टीमने एका बेवारस मादी श्वानाला रेस्क्यू केले.

मनीष तसरे -अमरावती : छातीला लटकलेल्या मांसाच्या गोळ्याने त्या मादी श्वानाला उठताही येत नव्हते आणि धडपणे बसताही येत नव्हते. तिच्या त्रासाने कळवळणाऱ्या प्राणिप्रेमींनी वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू हेल्पलाइनला कळविले. या संस्थेने चिकाटीने या मादी श्वानाला पकडून वसा ॲनिमल्स रेस्क्यू सेंटरला भरती करून घेतले. छातीला लटकलेल्या मांसाच्या गोळ्याचे वजन ८७० ग्रॅम होते. तो गोळा सर्जरी करून काढण्यात आला आहे.

प्राणिप्रेमी सुवर्णा देवघरे आणि विद्याप्रकाश चांडक यांच्या माहितीनुसार, सराफा बाजार परिसरातून वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू टीमने एका बेवारस मादी श्वानाला रेस्क्यू केले. पहिल्यांदा या श्वानाने हुलकावणी दिली. दुसऱ्यांदा टीम पूर्ण साहित्यनिशी सराफा बाजारात दाखल झाली आणि लगेच त्या मादी श्वानाला रेस्क्यू करत मंगलधाम परिसरातील श्री गोरक्षण व्हेटरनरी हॉस्पिटलला तपासणीसाठी दाखल केले. तेथे डॉ. सुमित वैद्य यांनी त्या मादी श्वानांची तपासणी करीत तिला वसा ॲनिमल्स रेस्क्यू सेंटरला भरती करून घेतले.

अडीच तासांची सर्जरी -शुक्रवारी सर्व तपासण्या करत डॉ. वैद्य आणि सहायक पशुचिकित्सक शुभमनाथ सायंके यांनी तब्बल २ तास ४० मिनिटे तिची सर्जरी करीत छातीला असलेला ८७० ग्रॅमचा ट्युमर यशस्वीपणे काढला. या सर्जरीसाठी इलेक्ट्रॉक्वाटरी आणि गॅस अनेस्थेशिया मशीनचा वापर करण्यात आला.

‘दुधाच्या गाठीमुळे होऊ शकतो कॅन्सर’बरेच वेळा लोक परिसरात जन्मलेल्या नवजात पिल्लांना पोत्यात भरून, बॉक्समध्ये बंद करून शहराबाहेर दूर नेऊन टाकतात. अशाने मादी श्वान कासावीस तर होतेच, शिवाय तिच्या शरीराचे दूध वापरले न गेल्याने छातीत गाठी निर्माण होतात. कालांतराने तिथे मस्टाइटिस्ट होतो किंवा ट्युमर तयार होतो. जास्त वाढ झालेला ट्युमर श्वानाला चालायला आणि बसायला त्रास देतो. जमिनीच्या संपर्कात आल्याने तो ट्युमर फुटू शकतो व त्यात इन्फेक्शन होऊन अळ्या पडू शकतात. 

टॅग्स :dogकुत्राdoctorडॉक्टर