वृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST2021-06-04T04:10:52+5:302021-06-04T04:10:52+5:30
अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील अर्जुननगरात एका वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न झाला. ही घटना बुधवारी ...

वृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न
अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील अर्जुननगरात एका वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न झाला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, घटनेची तक्रार उशिरा सायंकाळपर्यंत गाडगेनगर ठाण्यात दाखल झाली नव्हती.
चेनस्नॅचर्सनी ज्येष्ठ महिलांना लक्ष्य केले असून, बुधवारी मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न झाला. माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले हे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान कोविड काळात महिलांनी एकतर घराबाहेर निघू नये, आवश्यक कामासाठी बाहेर निघाल्या तरी अंगावर दागिने घालू नये, घरातील पुरुष मंडळीसोबतच बाहेर निघावे किंवा समूहात फिजिकल डिस्टसिंग ठेवून बाहेर निघावे, अशा सूचना ठाणेदारांनी गुरुवारी सकाळी अर्जुननगर परिसरात केल्या.
कोट
कोरोना काळात शक्यतो वृद्धांनी घराबाहेर पडू नये, जर फिरायला जायचे असेल तर घरातील जबाबदार पुरुष सोबत घ्यावा. काहीही शंका आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करावा.
- आसाराम चोरमले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गाडगेनगर