पूर्णानगर येथे तुरीची गंजी पेटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:12 IST2021-01-18T04:12:28+5:302021-01-18T04:12:28+5:30
फोटो पी १७ टाकरखेडा टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील पूर्णानगर शिवारात शेतकऱ्याने लावलेली तुरीची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. ...

पूर्णानगर येथे तुरीची गंजी पेटवली
फोटो पी १७ टाकरखेडा
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील पूर्णानगर शिवारात शेतकऱ्याने लावलेली तुरीची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. त्यामुळे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
पेटलेली गंजी दिसताच परिसरातील नागरिकांनी प्रकाश ठाकूर (रा. पूर्णानगर) यांना माहिती दिली. ते घटनास्थळी येईपर्यंत तुरीची गंजी जळून खाक झाली होती. प्रकाश ठाकूर यांनी सदर शेत लागवणीने केले होते. सोयाबीननंतर त्यांनी शेतामध्ये तुरीची लागवड केली होती. शनिवारी दुपारीच कापणी करून शेतात गंजी लावण्यात आली. रात्री ११ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावली. याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.