शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दहाचाकी ट्रक उलटला कुंपणभिंतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:22 IST

रेतीने भरलेला दहाचाकी ट्रक उलटून घराची कुंपणभिंत कोसळल्याने मंगळवारी सकाळी स्वस्तिकनगरात खळबळ उडाली. तो ट्रक ज्या घराच्या भिंतीवर उलटला, ते घर सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त पी.टी. पाटील यांच्या मालकीचे आहे.

ठळक मुद्देस्वस्तिकनगरातील घटना : घटनास्थळ सेवानिवृत्त डीसीपींचे निवासस्थान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेतीने भरलेला दहाचाकी ट्रक उलटून घराची कुंपणभिंत कोसळल्याने मंगळवारी सकाळी स्वस्तिकनगरात खळबळ उडाली. तो ट्रक ज्या घराच्या भिंतीवर उलटला, ते घर सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त पी.टी. पाटील यांच्या मालकीचे आहे. घटनेनंतर ट्रकचालक व क्लीनर हे दोघेही पसार झाले. या घटनेची तक्रार राजापेठ पोलिसांत करण्यात आली.सितारामनगरात बांधकामस्थळी ट्रक (एमएच २७ एक्स ६९५६) स्वस्तिकनगर मार्गाने जात होता. यादरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्यालगतचा मातीचा भराव ट्रकच्या भाराने खचला आणि एका बाजूने पूर्णपणे झुकलेला ट्रक पी.टी.पाटील यांच्या घराच्या आवारातील कुंपणभिंतीवर उलटला. ट्रक उलटल्याने व कुंपणभिंत पडल्याने मोठा आवाज झाला. तेथील रहिवासी अ‍ॅड. डी.बी. देशमुख यांच्यासह अन्य नागरिक घराबाहेर आले. यादरम्यान चालक व क्लीनरने ट्रकबाहेर येऊन पळ काढला. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी पी.टी. पाटील यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध भादंविच्या कलम ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला.दरम्यान, सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम झाल्यानंतर पाणीगळतीच्या दुरुस्तीसाठी मजीप्राच्या कंत्राटदाराने रस्त्यालगत खड्डा खोदला होता. तो व्यवस्थित न बुजविल्याने जमिनीच्या आतील भाग पोकळ राहिला. त्यामुळे ट्रक उलटल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.नो-एन्ट्रीत शिरले जड वाहनशहरात जड वाहनांना सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश नाही. नो-एन्ट्रीचे उल्लंघन करून ट्रक शहरात शिरला. त्यातच रहिवासी क्षेत्रातील अरुंद गल्लीतून बांधकामस्थळी जात होता. यादरम्यान हा अपघात घडला.सकाळी १० ते रात्री १० पर्यंत शहरात जड वाहनांना नो-एन्ट्री आहे. रहिवासी परिसरात शिरलेल्या त्या ट्रकसंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- रणजित देसाईसहायक पोलीस आयुक्त,

टॅग्स :Accidentअपघात