The truck overturned and hit 90 goats with the carrier | ट्रक उलटून वाहकासह ९० शेळ्या दगावल्या
ट्रक उलटून वाहकासह ९० शेळ्या दगावल्या

ठळक मुद्देभीषण अपघात : वरूड तालुक्यातील गाडेगावलगतची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : भोपाळहून हैद्राबादकडे बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला गाडेगावनजीक अपघात झाला. यात ९० शेळ्यांसह ट्रकवाहकाचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे ६ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बेनोडा शहीद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भोपाळहून हैद्राबादकडे बकऱ्या व मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एमपी ०४ जीबी १४८३ या ट्रकमध्ये २३० शेळ्यांची दाटीवाटीने वाहतूक केली जात होती. गाडेगावनजीकच्या वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी ट्रकमध्ये चालकासह पाच जण होते. त्यापैकी बंकरलाल बन्सीलाल (३०, रा. बिनगंज, मध्यप्रदेश) हा बकऱ्यांसोबत होता. चालक शिवम मुरली गिरी (२४, बेरसिया, ता. गुना), हेमंत राजू खाटीक (३०, रा. बरसत ता. गुना), हेमराज नारायण तंवर (३२, रा.राजस्थान), इम्रान बेग नसीम बेग (रा. गुना मध्यप्रदेश) हे चौघे ट्रकच्या केबिनमध्ये होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून शेळ्या व मेंढ्या ट्रकखाली दबल्या. यात ९० शेळया मृत्यूमुखी पडल्या. बंकरलाल बन्सीलाल हासुद्धा जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती रस्त्यावरून ये-जा करणाºयांनी बेनोडा शहीद पोलिसांना दिली. हेडकॉन्स्टेबल शशिकांत पोहरे व संतोष आवडकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालय वरूड येथे पाठविण्यात आला.

Web Title: The truck overturned and hit 90 goats with the carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.