अमरावती-नागपूर महामार्गावर ट्रकची ट्रॅक्टरला धडक; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 13:35 IST2021-03-13T13:33:47+5:302021-03-13T13:35:25+5:30

Amravati News भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरवरील दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगावजवळ शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास हा अपघात घडला.

Truck hits tractor on Amravati-Nagpur highway; Death of two farmers | अमरावती-नागपूर महामार्गावर ट्रकची ट्रॅक्टरला धडक; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

अमरावती-नागपूर महामार्गावर ट्रकची ट्रॅक्टरला धडक; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

ठळक मुद्देट्रकचालक पसार


 लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती: भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरवरील दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगावजवळ शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास हा अपघात घडला. कैलास हुंडीवाले (४०) व हुंडाआप्पा बहिहट ५५, दोघेही रा. रोशनखेडा) असे घटनास्थळीच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

             पहाटेच्या वेळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ते ट्रॅक्टरने तिवसा येथील शेतात निघाले होते. या अपघातात संजय दिवटे व मुकेश बिरकट हे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला धडक देणारा चालक ट्रक घेऊन घटनास्थळाहून पसार झाला आहे. माहितीनुसार ते शेतकरी चारा आणायला नागपूर मार्गाने निघाले होते. मात्र, मागून येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जबर धडक दिली. यात ट्रॅक्टरची ट्राली उलटली. यात दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत. दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

 

Web Title: Truck hits tractor on Amravati-Nagpur highway; Death of two farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात