किराणा दुकानात ट्रक शिरला; चिमुकली ठार, दोन गंभीर, मेळघाटच्या चिचखेडा येथील घटना
By प्रदीप भाकरे | Updated: November 1, 2022 22:35 IST2022-11-01T22:34:11+5:302022-11-01T22:35:28+5:30
Accident: पोल्ट्री फार्मसाठी आणलेले खत खाली करून परत जात असलेला ट्रक अचानक एका किराणा दुकानात शिरल्याने या अपघातात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला महिलेसह एक १४ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील चिंचखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली.

किराणा दुकानात ट्रक शिरला; चिमुकली ठार, दोन गंभीर, मेळघाटच्या चिचखेडा येथील घटना
- प्रदीप भाकरे
चिखलदरा - पोल्ट्री फार्मसाठी आणलेले खत खाली करून परत जात असलेला ट्रक अचानक एका किराणा दुकानात शिरल्याने या अपघातात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला महिलेसह एक १४ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील चिंचखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली.
अमोली सुनील पंडोले (८) असे मृताचे नाव असून, मयुरी योगेश वाघमारे (१४) व पूर्ण गोसावी बारवे (४५, सर्व रा. चिचखेडा) असे गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांना नजीकच्या टेब्रुसोडा आरोग्य केंद्र व नंतर उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. चिचखेडा येथील पोल्ट्री फार्मसाठी नागपूर येथून ट्रकमध्ये कोंबड्यांचे खाद्य आणण्यात आले होते. ते खत खाली करून परत जात असताना चालकाने ट्रक मागे घेतला. तो सरळ योगेश वाघमारे यांच्या किराणा दुकानात शिरला, त्यामध्ये हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे, या संदर्भात चिखलदरा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले.