ट्रकची दुचाकीला धडक; सैनिकाचा मृत्यू एक जखमी, रहाटगाव चौक परिसरातील घटना

By प्रदीप भाकरे | Updated: February 28, 2024 16:46 IST2024-02-28T16:45:44+5:302024-02-28T16:46:37+5:30

अविनाश अंबादास उईके (२४) रा. गणेशपूर, मोर्शी असे मृतक सैनिकाचे तर विशाल सुखीराम तुमडाम (१९) रा. टेंबुरखेडा, वरूड असे जखमीचे नाव आहे.

Truck collides with two-wheeler; Soldier killed, one injured, incident in Rahatgaon Chowk area | ट्रकची दुचाकीला धडक; सैनिकाचा मृत्यू एक जखमी, रहाटगाव चौक परिसरातील घटना

ट्रकची दुचाकीला धडक; सैनिकाचा मृत्यू एक जखमी, रहाटगाव चौक परिसरातील घटना

अमरावती : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी झाला. हा अपघात बुधवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव चौक परिसरात घडला. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अविनाश अंबादास उईके (२४) रा. गणेशपूर, मोर्शी असे मृतक सैनिकाचे तर विशाल सुखीराम तुमडाम (१९) रा. टेंबुरखेडा, वरूड असे जखमीचे नाव आहे. अविनाश हा भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. नुकताच तो सुटीवर घरी आला होता. बुधवारी सकाळी अविनाश हा मित्र विशाल याच्यासह दुचाकी क्रमांक एमएच २७ डीजी ३९४४ ने कामानिमित्त अमरावतीला जात होता. मार्गात रहाटगाव चौक परिसरातील एका हॉटेलजवळ त्याच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात अविनाशचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल हा जखमी झाला. अपघाताबाबत माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमी विशालला तातडीने उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Truck collides with two-wheeler; Soldier killed, one injured, incident in Rahatgaon Chowk area