ट्रक रस्ता दुभाजकावर चढला वाहनातील तांदूळ गायब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:09+5:30

चांदूरबाजार शहरापासून परतवाडा मार्गावर अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या जमापूर फाट्याजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास एक ट्रक रास्ता दुभाजकावर चढला. सदर ट्रक क्रमांक सी जे १२ यस ०६९३ असून हा ट्रक अंजनगाव सुर्जी येथून शहराकडे येत असल्याची माहिती आहे. दुर्घटनेवेळी या ट्रकमध्ये तांदळाचा साठा असल्याची माहिती आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

The truck climbed on the road divider, the rice in the vehicle disappeared? | ट्रक रस्ता दुभाजकावर चढला वाहनातील तांदूळ गायब?

ट्रक रस्ता दुभाजकावर चढला वाहनातील तांदूळ गायब?

googlenewsNext
ठळक मुद्देचालक फरार। प्रत्यदर्शनी बघितले ट्रकमध्ये तांदळाचे कट्टे, पोलीस विभाग अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : अंजनगाव सुर्जीहून परतवाडा मार्गे चांदूर बाजारात येत असलेला तांदळाने भरलेला ट्रक जमापूर फाटाजवळ रस्ता दुभाजकावर चढला. यात ट्रकमध्ये असलेला तांदूळ रस्त्यावर सांडले. मात्र, ट्रकचालक घटनास्थळाहून फरार झाची माहिती पोलिसांनी दिली.
चांदूरबाजार शहरापासून परतवाडा मार्गावर अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या जमापूर फाट्याजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास एक ट्रक रास्ता दुभाजकावर चढला. सदर ट्रक क्रमांक सी जे १२ यस ०६९३ असून हा ट्रक अंजनगाव सुर्जी येथून शहराकडे येत असल्याची माहिती आहे. दुर्घटनेवेळी या ट्रकमध्ये तांदळाचा साठा असल्याची माहिती आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. रात्री ११ वाजता दरम्यान काही प्रत्यक्षदर्शींनी ट्रकमध्ये तांदळाचे कट्टे बघितल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर या ट्रकमध्ये कोणत्याच प्रकारचा माल होता की नाही, याची पाहणी केली नसल्याचे सांगितले. त्या ट्रकमधून रातोरात माल खाली करण्यात आला. यात काही तांदूळ घटनास्थळीच पडून होते. यावरून ट्रकमध्ये तांदळाचे कट्टे असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र पोलिसांचा केलेल्या चौकाशिवर संशय निर्माण होत आहे.

आरोप तस्करीचे रॅकेट
सदर ट्रकमध्ये शासकीय तांदूळ असल्याची शंका आहे. अंजनगाव सुर्जीतील एक कुख्यात धान्य तस्कराने चांदूर बाजार येथील एका तस्करच्या माध्यमातून तांदूळ रफादफा केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी वेगळीच भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील तांदूळ तस्करीचे रॅकेट दाबले गेल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.

सदर घटनेप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात येणार आहे. तसेच ट्रकमध्ये माल होता. की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही.
- उदयसिंग साळुंके, पोलीस निरीक्षक

Web Title: The truck climbed on the road divider, the rice in the vehicle disappeared?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात