निर्दयतेने ३४ गोवंश घेऊन जाणारा ट्रक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST2021-03-17T04:15:01+5:302021-03-17T04:15:01+5:30

बड़नेरा : निर्दयतेने ३४ गोवंश वाहून नेणारा ट्रक महामार्ग पोलिसांनी लालखडी परिसरातून मंगळवार ताब्यात घेतला. यात तीन गोवंश मृतावस्थेत ...

A truck carrying 34 cows was seized | निर्दयतेने ३४ गोवंश घेऊन जाणारा ट्रक ताब्यात

निर्दयतेने ३४ गोवंश घेऊन जाणारा ट्रक ताब्यात

बड़नेरा : निर्दयतेने ३४ गोवंश वाहून नेणारा ट्रक महामार्ग पोलिसांनी लालखडी परिसरातून मंगळवार ताब्यात घेतला. यात तीन गोवंश मृतावस्थेत सापडले. नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल केले.

पोलीस सूत्रांनुसार, बडनेरा महामार्ग सुरक्षा पथक हे पेट्रोलिंग करीत असताना एका ट्रकमधून निर्दयतेने गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नांदगाव पेठ टोलनाक्याजवळ सी.जी. ०७ सी.बी. ०९७७ क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न असता, तो भरधाव पुढे निघाला. महामार्ग पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला. लालखडी परिसरातील एका मैदानात चालक ट्रक सोडून पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक राजू रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षक अधिनियम प्राण्यांना निर्दयतेने वागविणे मोटार वाहन कायद्यात अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. जखमी गोवंशावर उपचार केले जात आहे. सदर ट्रक नागपूर हुन अमरावतीकडे येत होता. या कारवाईत जमादार अनिल निंघोट, सुधीर राऊत, मंगेश रौराळे, नितीन ठाकरे, प्रकाश सोनोने, दिनेश राठोडसह महामार्ग पोलीस व इतरही कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: A truck carrying 34 cows was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.