कुपोषण निर्मूलनासाठी आता त्रिसूत्री

By Admin | Updated: August 6, 2014 23:35 IST2014-08-06T23:35:23+5:302014-08-06T23:35:23+5:30

मेळघाटातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी किशोरवयीन मुलींमधील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविणे, गरोदर मातांसाठी मदत केअर सेंटर सुरू करणे व कुपोषित बालकांच्या आहार व आरोग्यावर

Trisutri now to eradicate malnutrition | कुपोषण निर्मूलनासाठी आता त्रिसूत्री

कुपोषण निर्मूलनासाठी आता त्रिसूत्री

नवे धोरण : आगामी स्थायी, सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार प्रस्ताव
जितेंद्र दखने - अमरावती
मेळघाटातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी किशोरवयीन मुलींमधील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविणे, गरोदर मातांसाठी मदत केअर सेंटर सुरू करणे व कुपोषित बालकांच्या आहार व आरोग्यावर व्हीसीडीसीनंतर पुढील दोन महिने लक्ष ठेवून विशेष आहार पुरविणे असा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला. जि.प. प्रशासनातर्फे लवकरच आगामी स्थायी समिती सभेत हा कार्यक्रम मांडला जाणार आहे. मंजुरी मिळताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमासाठी एनआरएचएम जिल्हा नियोजन समिती, लोकसहभाग व लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतले जाणार आहे
असा असेल
त्रिसूत्री कार्यक्रम
आरोग्य तपासणी कुपोषित बालकांची समस्या, जन्मत:च असू नये, या समस्येवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून किशोरवयीन अवस्थेपासून काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती बरोबरच या मुलींमधील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविल्यास भविष्यातील मातांची शारीरिक वाढ योग्य पद्धतीने घडवून आणता येईल. त्यासाठी किशोरवयीन मुली व गरोदर मातांची आरोग्य तपासणी हिमोग्लोबीन, वय, वजन, उंची मोजली जाणार आहे.

Web Title: Trisutri now to eradicate malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.