वसतिगृहांना आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न

By Admin | Updated: August 11, 2015 00:26 IST2015-08-11T00:26:37+5:302015-08-11T00:26:37+5:30

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बांधलेल्या नवीन शासकीय वसतिगृहांना सर्व सुविधायुक्त करुन आयएसओ दजार्चे मानांकन मिळवण्यासाठी प्...

Tried for ISO standards for the hostels | वसतिगृहांना आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न

वसतिगृहांना आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न

राजकुमार बडोले : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाचे लोकार्पण
नांदगाव खंडेश्वर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बांधलेल्या नवीन शासकीय वसतिगृहांना सर्व सुविधायुक्त करुन आयएसओ दजार्चे मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी केले.
नांदगाव खंडेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार श्रीकांत देशपांडे, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण डी.आर. वडकुते, सहायक आयुक्त डी.डी. फिस्के, समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण उपस्थित होते.
शासकीय वसतिगृहांमध्ये उच्च प्रतिचे वाचनालय, अभ्यासिका या सुविधेसोबतच भविष्यात शासकीय निवासी शाळांमध्ये सी.बी.एस.इ पध्दतीचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही बडोले यांनी सांगितले. मुलींच्या वसतिगृहात कटाक्षाने महिला गृहपालांना प्राध्यान्य देण्यात येईल. गृहपालांच्या रिक्त पदांची भर्ती लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी पुढे नमुद केले.
बार्टीच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जमाती,अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी स्पर्धा परीक्षा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आमदार निधीतून या वसतिगृहातील विद्यार्थींसाठी वॉटर प्युरिफायर व वॉटर कुलर भेट देण्याची घोषणा केली. स्थानिक आमदार वीरेंद्र जगताप यांनी नांदगाव खंडेश्वर येथील प्रियदर्शनी शासकीय मुलींच्या वसतिगृहाची क्षमता ५० वरुन १०० करण्याची मागणी केली. त्यालाही मंत्र्यांनी तत्काळ होकार दिला. यावेळी तत्कालीन उपअभियंता पळसकर, बांधकाम व्यवसायिक नितीन गभने, तत्कालीन सहायक अभियंता संजीव काळे आदींचा गौरव करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tried for ISO standards for the hostels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.