शबरी योजनेचा लाभ आदिवासींना व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST2021-06-18T04:09:55+5:302021-06-18T04:09:55+5:30
धानोरा,तरोडा,भिवकुंडी ही गावे गटग्रामपंचायत मध्ये येत असून या गावांमध्ये शबरी योजनेतील केवळ वार्षीक २ ते ३ घरकुल देन्यात ...

शबरी योजनेचा लाभ आदिवासींना व्हावा
धानोरा,तरोडा,भिवकुंडी ही गावे गटग्रामपंचायत मध्ये येत असून या गावांमध्ये शबरी योजनेतील केवळ वार्षीक २ ते ३ घरकुल देन्यात येते. मात्र या गावांमध्ये साधारणतहा ९५ टक्के आदिवासी ग्रामस्थ आहेत त्यासाठी कमीत कमी वेळेत तालुक्यातील जास्तीत जास्त परिवारांना याचा लाभ मिळावा. याकरिता छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेकडून
शबरी योजनेची वार्षिक घरकुलाची संख्या वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष श्रणित राऊत, उपसरपंच, आनंद धुर्वे, अंकित ठवळी, विनीत उबाळे, ग्रा.स.विजय सिरसाम, ग्रा.स.ईश्वर धुर्वे, स्वप्नील पाटणकर, नितेश गोडबोले, सुभाष पुसाम, गजानन चांदे, ऋत्विक राऊत, अभि देशमुख,वैष्णव चिंचोळकर, आकाश शिंगरवाडे, योगेश उईके, अंकित मरसकोल्हे, सुधाकर उईके, गजानन, गायकवाड, रामू धुर्वे, नीलेश उईके, कैलास पंधरे, सचिन तंतरपाळे, कपिल युवनाते, नितेश वानखडे, आकाश कुरवाडे, आनंद टेकाम, कपिल युवनाते आदी उपस्थित होते.