शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिला राज्यपालांना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ परत करणार !

By गणेश वासनिक | Updated: January 24, 2025 15:07 IST

Amravati : पुणे जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यावर अन्याय; बनावट जातप्रमाणपत्रावर बढती, खऱ्या आदिवासींना आरक्षणातून वंचित ठेवले

अमरावती : शासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ गेल्या २५ वर्षांपासून मिळत नसल्यामुळे पुणेजिल्हा परिषदेतील अनुसूचित जमातीच्या महिला कर्मचारी सुरेखा तारडे या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी स्वतःचे जातवैधता प्रमाणपत्र आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यामार्फत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे परत करणार आहेत. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे येथील विभागीय आयुक्तांनी १०० बिंदुनामावलीनुसार रोस्टर तपासणीच केली नाही. प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी आदिवासी आरक्षणाचा लाभ घेतला, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले असले, तरी बनावट जातप्रमाणपत्र सादर करून आरक्षणाचा लाभ घेतला. तरीही आरक्षणाचा लाभच घेतला नाही, असे लेखी लिहून देऊन पुन्हा पदोन्नती मिळवली. त्यामुळे मागील २५ वर्षांपासून तारडे यांच्यावर अन्याय झालेला असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभच मिळालेला नाही. सन १९९९ मधील त्यांच्याच आदेशातील अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्ती मिळवलेल्या बिगर आदिवासी कर्मचाऱ्यांना तीनवेळा बढती देण्यात आली. परंतु, मुळातच घटनात्मक हक्काच्या राखीव जागा असतानासुद्धा तारडे यांना बढतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

पुणे जिल्हा परिषदेत जातवैधता प्रमाणपत्र नसतानाही अनेक मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक, अधीक्षक व कक्ष अधिकारी या पदांवर पदोन्नती दिलेल्या आहेत. हा गोरखधंदा सन २००९ पर्यंत चालूच होता. शासन निर्णय १८ ऑक्टोबर १९९७ नुसार नेमणूक अथवा पदोन्नती करण्यापूर्वी सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष), पुणे यांच्याकडून १०० बिंदुनामावली तपासणी करणे बंधनकारक होते. परंतु, तसे न करता प्रथम नेमणूक व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून घेतली. आरक्षणानुसार बिंदुवरून न घेता नेमणुकीनुसार अनुक्रमांकाने नोंदणी केलेल्या आहेत.

कल्याण समितीचीही फसवणूकतत्कालीन अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आमदार जगदीशचंद्र वळवी यांच्याकडे २५ सप्टेंबर २०१२ रोजी सुरेखा तारडे यांनी निवेदन दिले होते. समिती प्रमुखांनी त्यांना न्याय देण्याबाबत आदेश दिले होते. सर्व कागदपत्रे तपासून न्याय देण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेने दिले होते. परंतु, अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही.

विधानसभा उपाध्यक्ष, आमदारांची पत्र कचराकुंडीतमागील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार भाई जगताप, आमदार देवेंद्र भुयार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह अनेकांनी पत्र देऊन न्याय देण्याची मागणी केली. तथापि, पुणे जिल्हा परिषदेने त्यांची पत्र कचराकुंडीत फेकली.

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषदPuneपुणे