आदिवासींचा वरुड तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: August 6, 2014 23:36 IST2014-08-06T23:36:18+5:302014-08-06T23:36:18+5:30
राज्यातील अनुसूचित जमाती च्या यादीत अन्य जमातीचा समावेश होऊ नये या मागणीसाठी आदिवासी बांधवांच्या आरक्षण बचाव कृती समितीने बुधवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला.

आदिवासींचा वरुड तहसीलवर मोर्चा
वरुड : राज्यातील अनुसूचित जमाती च्या यादीत अन्य जमातीचा समावेश होऊ नये या मागणीसाठी आदिवासी बांधवांच्या आरक्षण बचाव कृती समितीने बुधवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे ’ या घोषणांनी परिसर दूमदूमून गेला होता. मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मीती पासून खऱ्या आदीवासी जमातीवर अन्याय होत आहे. १९७६ पर्यंत क्षेत्र बंधन आणि पुढे १९९०-९१ मध्ये बोगस आदिवासींनी अतिक्रमण करुन देशातील आदीवासींच्या सवलती हिरावून घेतल्या. यामुळे आरक्षणाच्या हक्कापासून खरा आदीवासी वंचित राहिला. आदिवासींच्या आरक्षण हिरावून घेवून घुसखोरी करण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होवू देणार नाही असा सूर आदीवासी नेत्यांनी लावला. आदीवासींच्या हक्कावर गदा आणण्याचा राज्यकर्त्यांनी प्रयत्न करु नये असा ईशारा यावेळी देण्यात आला. आदीवासींचे आरक्षण वाचविण्यासाठी आदीवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर महात्मा फुले चौक येथून मोर्चा नेण्यात आला. तालुक्यातील आदीवासी बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आदीवासी आरक्षण बचाव कृती समिती अंतर्गत आॅल इंडिया आदीवासी एम्प्लाईज युनियन , अखिल भारतिय आदीवासी विकास परिषद, आदीवासी सामाजिक एकता मंच, आदीवासी युवा क्रांतीदल, क्रांतीसूर्य बिरसामूंडा युवा ब्रिगेड, आदीवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पारधी समाजाचे नेते मतीन भोसले, विठ्ठलराव मरापे, किशोर चौरसिया, देवेंद्र भूयार,अजाब उईके, रामेश्वर युवनाते, छोटू कुमरे, गोपाल धूर्वे,दिवाकर सिरसाम, रमेश आहाके,धनराज गजाम, सुधिर युवनाते, मुरलीधर मरस्कोल्हे, अशोक पंधरे, प्रदिप सिरसाम, सुनिता कुमरे, पं.स.सदस्य मंगेश धुर्वे, नगरसेवक तुषार धूर्वे, जि.प.सदस्या अर्च़ना टेंभरे, रामदास धूर्वे, राजकुमार धूर्वे, राजू मरकाम, जयपाल इवनाते, जगदीश कुसराम यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुक्यातून नागरिक आले होते.