शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मजुरांना नेणारा ट्रॅक्टर उलटला, २० जखमी तीन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 21:25 IST

तीन गंभीर : अंजनगाव थांब्यावरील घटना 

परतवाडा (अमरावती) : लगतच्या बेलखेडा आणि हत्तीघाट या आदिवासी पाड्यातील जवळपास ४० मजुरांना पांढरी येथे घेऊन जाणारा भरधाव  ट्रॅक्टर उलटला. या अपघातात तीन मजूर गंभीर, तर २० जण किरकोळ जखमी झाले.  सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अंजनगाव थांब्यालगत ही घटना घडली.  या घटनेने अकोला-चिखलदरा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

एमएच ३० बी ८८०९ या  क्रमांकाचा ट्रॅक्टरमधून ४० मजूर नजीकच्या पांढरी येथे शेतात पेरणीसाठी जात होते. अंजनगाव थांब्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली उलटली. त्यात काही मजूर रस्त्यावर फेकले गेले, तर काही ट्रॉलीखाली दबले. त्यात त्यांच्या हातापायासह डोक्याला मार लागला. त्यातील रूपी रामचंद्र काळे (२५, रा. बेलखेड़ा), नीला अशोक सावरकर (२४, रा. हत्तीघाट), पिंकी बावसकर (१४, रा. हत्तीघाट) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य जखमींमध्ये उषा सावरकर (१८), दुर्गा राजू बावसकर (२५), यशोदा शंकर दहीकर (१७), लीला अशोक सावरकर (२३), सपना मनोहर बेलसरे (२५), सचिन भोला बेलसरे  (२१), बाली राजू बेलसरे (१५), मीना गणेश दारसिंबे (३०), राजू रमेश पाटणकर (२१), संतोष संतू बेठेकर (२४, सर्व रा. हत्तीघाट) व गंगू मंगल भूसूम (५०),  चैता सोमा कासदेकर (२५), रामरती रामकिशन उमरकर (२५),  बाला अखंडे (४०), किरण नामदेव जामूनकर (१८),  रविना बंसी  भुसूम (१६), सोनू गंगाराम दारसिंबे (३०, सर्व रा. बेलखेडा) आदींचा समावेश आहे.

वाहतूक पोलीस शहराबाहेरपरतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांतील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था सतत चर्चेत असताना, येथील वाहतूक विभागाचे कर्मचारी शहराबाहेर दिसत असल्याचे सर्वश्रुत आहे. ट्रॅक्टरमध्ये मजुरांना बेदरकार कोंबून नेले जात असतानाही कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. वाहतूक पोलीस शहर वाºयावर सोडून धारणी, अमरावती व अकोला या महामार्गावर वसुलीत मग्न असल्याची तक्रार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे झालेल्या एका बैठकीत केली होती. त्यानंतरसुद्धा कुठल्याच प्रकारची सुधारणा झाली नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmravatiअमरावती