शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आदिवासी विकास विभागात बदल्यांची धूम, सोयीच्या ठिकाणासाठी कर्मचाऱ्यांची फिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 5:24 PM

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालय स्तरावर शासकीय सेवकांच्या नियतकालीन बदल्यांची धूम सुरू झाली आहे.

-  गणेश वासनिक 

अमरावती - आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालय स्तरावर शासकीय सेवकांच्या नियतकालीन बदल्यांची धूम सुरू झाली आहे. तीन वर्षे सेवेचा कार्यकाळ पूर्ण करणाºया बदलीपात्र कर्मचा-यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, बदलीदरम्यान सोयीचे ठिकाण मिळावे, यासाठी अनेकांनी आपली ‘वर्णी’ लागावी, यासाठी प्रयत्न चालविल्याचे चित्र आहे.शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने समुपदेशानाद्वारे बदलीबाबतचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तांनी कर्मचा-यांच्या नियतकालीन बदल्यासंदर्भात तयारी चालविली आहे. अकोला, धारणी, किनवट, पांढरकवडा, औरंगाबाद, पुसद व कळमनुरी या सात प्रकल्प कार्यालय स्तरावर कार्यरत विविध संवर्गातील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार समुपदेशनाद्वारे कर्मचाºयांची बदली अपेक्षित आहे. मात्र, काही बदली पात्र कर्मचाºयांनी महत्त्वाच्या ठिकाणी बदलीसाठी जोरदार फिल्डिंग लावत असल्याचे वास्तव आहे. कर्तव्य बजावताना सोयीचे ठिकाण मिळावे, यासाठी बदलीपात्र कर्मचारी अपर आयुक्तांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनासमोर गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. विशेषत: पांढरकवडा, कळमनुरी व धारणी प्रकल्पातील बदलीपात्र काही कर्मचाºयांनी थेट मंत्रालयातून दबावतंत्र आणल्याची माहिती आहे. कुटुंबीयापासून दूर न होता मुख्य रस्त्यालगतच्या आश्रमशाळा, वसतिगृहात बदलीसाठी अनेकांनी वाटेल ते किंमत मोजण्याची तयारी चालविल्याचे बोलले जात आहे. ३० टक्के बदलीचे प्रमाण लागू करण्यात आल्यानुसार अमरावती ‘ट्रायबल’मध्ये १७ संवर्गात ३०७ बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्यात आली आहे.

अशा होणार संवर्गानुसार बदल्याआदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत  पदवीधर प्राथमिक शिक्षक १४, माध्यमिक शिक्षक २०, अधीक्षक पुरूष २६, अधीक्षक महिला २४, उच्च माध्यमिक शिक्षक ४८, कनिष्ठ लिपिक ७१, वरिष्ठ लिपिक १४, उपलेखापाल ७, निरीक्षक २, कार्यालय अधीक्षक ३, माध्यमिक मुख्याध्यापक १८, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीे १६, गृहपाल पुरूष १९, गृहपाल महिला १४, ग्रंथपाल ४, प्रयोगशाळा सहायक ५ तर लघुतंत्र लेखक २ असे संवर्गानुसार कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत.

आर्थिक व्यवहारावर ‘एसीबी’ची नजर?आदिवासी विकास विभागात अपहार, भ्रष्टाचार होत असल्याचे यापूर्वी एसीबीने धाडसत्र राबवून कारवाईद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होणार असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूणच प्रक्रियेवर सूक्ष्म नजर ठेवली आहे. कर्मचा-यांना सोयीच्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी काही दलालदेखील सक्रिय झाल्याची माहिती आहे. त्याअनुषंगाने एसीबीच्या रडारवर ‘ट्रायबल’चे काही अधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

टॅग्स :TransferबदलीAmravatiअमरावतीGovernmentसरकार