मद्यपी रुग्णांना मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार
By Admin | Updated: August 5, 2014 23:15 IST2014-08-05T23:15:31+5:302014-08-05T23:15:31+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ८ हा मद्यपी रुग्णांनी फुल्ल झाला आहे. जिल्ह्यात मद्यपी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांनी मद्यपान सोडावी याकरिता मानसोपचार तज्ज्ञांकडून

मद्यपी रुग्णांना मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ८ हा मद्यपी रुग्णांनी फुल्ल झाला आहे. जिल्ह्यात मद्यपी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांनी मद्यपान सोडावी याकरिता मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन व औषधोपचार केला जात आहे.
दारुच्या व्यसनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तसेच अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सततच्या मद्य सेवनाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम जाणवल्यावर त्यांना उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येते. जिल्ह्याभरात लाखो नागरिक मद्य प्राशन करतात. मात्र सर्वच मद्यपीचे आरोग्य चांगले राहील असे होत नाही. मद्याच्या अतिसेवनाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज १० मद्यपी रुग्ण दाखल केले जात असून या रुग्णांवर वॉर्ड क्र. ८ मध्ये उपचार केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत मद्यपी रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे इर्विनमधील दाखल रुग्णांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. वॉर्ड क्र. ८ मध्ये मद्यपी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. खाटांची संख्या कमी असल्याने एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेत आहेत. वॉर्ड क्र. ८ मध्ये महिन्याभरात जवळपास ७० ते ८० मद्यपी रुग्णांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यामध्ये काही रुग्णांच्या शरिरातील अवयव निकामी झाले आहेत. कोणाची किडणी तर कोणाचे लिव्हर निकामी होत असल्याचे उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निर्देशनास आले आहे. काही रुग्ण रक्तांच्या उलट्या करतानाही दिसत आहे. सततच्या मद्य सेवनामुळे शरीरातील हे अवयव निकामी होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टराकडून सांगण्यात येत आहे. या मद्यपींना औषधोपचारासोबतच समुदेशनाची आवश्यकता भासत असल्याने त्या रुग्णांना समुपदेशन करण्यात येत आहे. याकरिता वैद्यकीय अधिकारी सुनीता मेश्राम, फिजीशियन वारकरी हे रुग्णांवर औषधोपचार करताना मद्य सोडण्याचे समुदेशन करित आहेत. तसेच मनोरुग्ण तज्ज्ञ एस.एस. गुल्हाने हे मद्यपी रुग्णांना समुपदेशनातून औषधोपचार करित आहे. (प्रतिनिधी)