ट्रॅव्हल्सने आदिवासी विद्यार्थ्याला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:12 IST2018-01-20T23:11:59+5:302018-01-20T23:12:48+5:30

तालुक्यातील शिंगणापूर फाट्याजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने एका जणाला चिरडून ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

Travels hit tribal student | ट्रॅव्हल्सने आदिवासी विद्यार्थ्याला चिरडले

ट्रॅव्हल्सने आदिवासी विद्यार्थ्याला चिरडले

ठळक मुद्देशिंगणापूर फाट्यावरील घटना : नागरिकांचा दोन तास ठिय्या

दर्यापूर : तालुक्यातील शिंगणापूर फाट्याजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने एका जणाला चिरडून ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. छुन्नू लाला कासदेकर (१७) असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अकोटवरून दर्यापूरकडे एमएच ३० बी ३२४९ क्रमांकाची ट्रॅव्हल्स भरधाव येत होती. शिंगणापूर फाट्यावर नांदेडहून दारापूरकडे पायी जाणाऱ्या छुन्नूला ट्रॅव्हल्सने धडक दिली. ट्रॅव्हल्सची एका बाजूची दोन्ही चाके त्यांच्या अंगावरून गेली. यात छुन्नूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी दारापूर व शिंगणापूर फाट्यावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी करीत दोन तास ठिय्या दिला. यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.

Web Title: Travels hit tribal student