शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

तर कॅमेऱ्यात व्याघ्रदर्शन, जंगलातील मुख्य पाणवठ्यांवर ‘ट्रॅप कॅमेरे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 05:32 IST

वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे निर्देश

गणेश वासनिक

अमरावती : मार्च महिन्यातच सूर्य तापू लागल्याने यंदा जंगलात पाणीटंचाईची तीव्रता जाणवेल, असे संकेत आहेत. वनक्षेत्रातील नैसर्गिक, कृत्रिम पाणवठे वन्यजीव, पशु-पक्ष्यांसाठी सज्ज करण्याचे निर्देश मिळाले आहेत. विशेषत: मुख्य पाणवठ्यावर ‘ट्रॅप कॅमेरे’ बसवावे आणि येथे रात्री-अपरात्री वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशा सूचना वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिल्या आहेत.

विदर्भात सहा व्याघ्र प्रकल्प, नऊ अभयारण्य आणि २० राखीव वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यात पाणी आटत असल्याची बाब वन्यजीव विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्याघ्र प्रकल्प अथवा वनविभागातील पाणवठ्यांचा आढावा घेऊन पाणीटंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्याच्या सूचना आहेत. उन्हाळा प्रारंभ होताच विदर्भातील पाणवठ्यांवर विषप्रयोगाद्धारे वाघ, बिबट्यांची शिकार केली जाते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना  नियमित पाणवठ्यांची तपासणी करावी लागणार आहे. ज्या पाणवठ्यांवर वन्यजीव मोठ्या संख्येचे तृष्णा भागविण्यासाठी येतात, त्या पाणवठ्यांवर ‘ट्रॅप कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांची नियमित तपासणी करावी लागणार आहे. 

वनक्षेत्रात नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन तपासणी करून घ्यावी लागेल. युरियामिश्रित पदार्थ, विषप्रयोेगाबाबत वनाधिकाऱ्यांनी सजग असावे. पाणवठ्यांबाबत वनकर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. पाणवठ्यात तपासणीसाठी पीए पेपरचा वापर करावा. पाणवठ्याची दररोज देखरेख आणि पाणी तपासणी करावी. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकांनी आकस्मिक भेट देऊन पाणवठे तपासणी करावी, असे वाईल्ड लाईफचे पीसीसीएफ यांनी कळविले आहे. 

उन्हाळ्यात वन्यजीवांबाबत अतिशय सजग राहावे लागते. विशेषत: पाणवठ्यांवर विषप्रयोग, शिकारीच्या घटना घडतात. त्यामुळे मुख्य पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसवून त्याद्वारे नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पाणवठ्यांची नियमित तपासणी केली जाणार आहे.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर.

 

टॅग्स :Tigerवाघcctvसीसीटीव्ही