शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

पॅन केकमध्ये अळ्या विद्यार्थ्यांना उलट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 1:32 AM

गांधीनगरातील रहिवासी विशाल विजय वाटाणे यांचा मुलगा होलीक्रॉस संस्थेच्या शाळेत ज्युनिअर केजी-१ शाखेत शिक्षण घेत आहे. त्यांच्या मुलाचा शुक्रवारी वाढदिवस होता. आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी विशाल वाटाणे यांनी राजकमल चौकाजवळील गोल्डन बेकरीतून एगलेस पॅन फू्रट केक खरेदी केले. मुलाने शाळेतील मित्र-मैत्रिणींना केक वाटले. केक खाल्ल्यावर लगेचच दोन मुलांचा मळमळ व्हायला लागली. त्यांनी उलट्याही केल्या.

ठळक मुद्देशाळेतील प्रकार । वाढदिवसानिमित्त केक वाटपादरम्यानची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना केक वाटप करताना, त्या केकमध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी कॅम्प रोड स्थित होलीक्रॉस संस्थेच्या शाळेत केजी-१ शाखेतील विद्यार्थ्यांसोबत घडला. केक खाल्ल्यामुळे दोन चिमुकल्यांना उलट्या झाल्यात. या घटनेमुळे विद्यार्थी भेदरले होते. गोल्डन बेकरीमधून खरेदी केलेल्या या केकची तक्रार पालकाने अन्न व औषध विभागाकडे नोंदविली. त्यानुसार एफडीए अधिकाऱ्यांनी दुकानातील केकचे नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.गांधीनगरातील रहिवासी विशाल विजय वाटाणे यांचा मुलगा होलीक्रॉस संस्थेच्या शाळेत ज्युनिअर केजी-१ शाखेत शिक्षण घेत आहे. त्यांच्या मुलाचा शुक्रवारी वाढदिवस होता. आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी विशाल वाटाणे यांनी राजकमल चौकाजवळील गोल्डन बेकरीतून एगलेस पॅन फू्रट केक खरेदी केले. मुलाने शाळेतील मित्र-मैत्रिणींना केक वाटले. केक खाल्ल्यावर लगेचच दोन मुलांचा मळमळ व्हायला लागली. त्यांनी उलट्याही केल्या. हा प्रकार पाहून शाळेतील शिक्षकांनी केक वाटण्यास मनाई केली. केकवरील मुदत तपासली. शिक्षकांनी या घटनेची माहिती विशाल वाटाणे यांना दिली. विशाल यांच्यासह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन ते सर्व केक ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी गोल्डन बेकरी गाठून तेथील संचालकास जाब विचारला. सदर केक नागपूरच्या अजित नावाच्या कंपनीकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. विशाल वाटाणे यांनी थेट एफडीए गाठून तक्रार नोंदविली.एफडीए अधिकाºयांनी गोल्डन बेकरी गाठून संबंधित केकचे नमुने ताब्यात घेतले. ते तपासणीलाही पाठविले. यासंदर्भात शाळेतील फादर जे.ए. रॅमसिन यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.कस्टमर केअर क्रमांक अस्तित्वात नाहीकेकच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ आहे. ६० दिवसांच्या आत या उत्पादनाचा वापर करावा, असे नमूद आहे. ३० दिवसांत उत्पादन वापरावे, असाही उल्लेख एका ठिकाणी आहे. मात्र, त्यावर खोडतोड करण्यात आली आहे. उत्पादन तारखेपासून ५७ दिवसांनंतर विक्री केल्याचे निदर्शनास येत आहे. या पाकिटाच्या लेबलवर ०७१२-२२५१५५९ हा कस्टमर केअर क्रमांक दिला आहे. सदर क्रमांकावर संपर्क साधला असता, क्रमांक अस्तित्वात नसल्याचा संदेश ऐकू येतो.गोल्डन बेकरीतून घेतलेल्या केकमध्ये अळ्या आढळल्याची तक्रार प्राप्त झाली. तेथील केकचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- सुरेश अन्नपुरेसहआयुक्त (अन्न व औषध विभाग)आम्ही केक विक्रीचा व्यवसाय करतो. केक नागपूरच्या बेकरीचे असून, त्याची आम्ही विक्री केले. ते कालबाह्य झालेले नव्हते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केकचे नमुने ताब्यात घेतले आहेत.- नंदकिशोर मुलानीसंचालक, गोल्डन बेकरी

टॅग्स :foodअन्न