ट्रेलर- दुचाकी धडकेत तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST2021-03-20T04:13:07+5:302021-03-20T04:13:07+5:30
अमरावती : नागपूर महामार्गावर रिंगरोड चौकात ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वडील ठार, तर आईसह चिमुकली जखमी झाल्याची घटना ...

ट्रेलर- दुचाकी धडकेत तीन ठार
अमरावती : नागपूर महामार्गावर रिंगरोड चौकात ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वडील ठार, तर आईसह चिमुकली जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. मात्र उपचार शुक्रवारी मुलीचा व आईचाही मृत्यू झाला.
नांदगावपेठ पोलिसांच्या माहितीनुसार, गौतम शंकर मेश्राम (४५ रा. विर्शी), पत्नी कविता गौतम मेश्राम (४०) व मुलगी जिया गौतम मेश्राम (९, दोन्ही रा. विर्शी) मृताचे नाव आहे.
गौतम मेश्राम, पत्नी व मुलगी दुचाकीने घरी जात असताना अमरावतीकडून येणाऱ्या ट्रेलर क्रमांक एनएल ०१ एई ४६७७ ने दुचाकीला जबर धडक दिली. वडिलासह जखमी मायलेकीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी गौतम मेश्राम यांना डॉक्टरांनी गुरुवारीच मृत घोषित केले. मुलगी जिया व तिच्या आईला गंभीर दुखापत झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, या ठिकाणी दोघांचाही शुक्रवारी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी ट्रेलरचालक प्रशांत शर्मा (२८, रा. अजगरी बिहार)याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदार कुरळकर करीत आहेत.