शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून तेंदुपानाची तस्करी

By admin | Updated: May 19, 2014 23:02 IST

मेळघाटातील प्रादेशिक वन विभागातर्फे धारणी, ढाकणा, रेल्वे धूळघाट या वनपरिक्षेत्रात तेंदुपान संकलनाचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र संबंधित तेंदुपान कंत्राटदाराने वनपरिक्षेत्रासह व्याघ्र प्रकल्पातून

राजेश मालवीय - धारणी

मेळघाटातील प्रादेशिक वन विभागातर्फे धारणी, ढाकणा, रेल्वे धूळघाट या वनपरिक्षेत्रात तेंदुपान संकलनाचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र संबंधित तेंदुपान कंत्राटदाराने वनपरिक्षेत्रासह व्याघ्र प्रकल्पातून तेंदुपान अवैधरीत्या तोडणे सुरू केल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. नियमबाह्य व्याघ्र प्रवेशामुळे मजुरांसह वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

प्रादेशिक वनपरिक्षेत्र सोडून व्याघ्र प्रकल्पातूनच तेंदुपान तोडण्याचे काम जोरात सुरू आहे. उन्हाळ्यात दिवसांत व्याघ्र क्षेत्रात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशातच तेंदूपान तोडणार्‍या मजुरांचा वन्यप्राण्यांना धोका वाढला आहे. त्यामुळे तेंदुपान तोडणीवर बंदी तर रात्रीची वाहतूकही बंद करण्यात येत आहे. अशा वन अधिनियमाला न जुमानता वनपरिक्षेत्र अधिकारी व व्याघ्र प्रकल्प अधिकार्‍यांनी तेंदुपान कंत्राटदार आर्थिक देवाण-घेवाण करून प्रतिबंधित व्याघ्र प्रकल्पातून तेंदूपान तोडण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. कंत्राटदाराच्या निर्देशावर मजूरवर्ग व्याघ्र प्रकल्पातून तेंदुपान तोडत असून काही मजुरांकडून चक्क टेंभरूचे वृक्ष कापून फेकले जात आहे. हा संपूर्ण प्रकार वन अधिकारी, वनरक्षक, व्याघ्र प्रकल्प अधिकार्‍यांसमोर सर्रास सुरू आहे.

तेंदुपाने संकलनासाठी भल्या पहाटे मजूर वर्ग व्याघ्र जंगलात प्रवेश करतात. मात्र, पहाटेच वन्यप्राणी पाण्यासाठी पाणवठय़ाकडे येत असतात. यावेळी वन्य प्राण्यांकडून हल्ला होण्याची भीती असते. मजुरांकडेही शस्त्रे असल्यामुळे एकमेकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील धारणी, ढाकणा, धूळघाट रेल्वे या वनपरिक्षेत्रालगतच ेव्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव गुगामल, ढाकणा व्याघ्र प्रकल्प, चौराकुंड, हरिसाल या क्षेत्रात वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. मात्र, मजूर व्याघ्र क्षेत्रातून सर्वाधिक तेंदुपाने संकलित करीत आहेत. काही मोजक्या रकमेत दरवर्षी तेंदुपाने कंत्राटाद्वारे दिली जाते. त्या बदल्यात वनविभाग व व्याघ्र प्रकल्पातील पूर्ण मेळघाटचे जंगल कंत्राटदाराच्या स्वाधीन केले जाते. कंत्राटदाराची वनरक्षकापासून वनाधिकारी, व्याघ्र प्रकल्प अधिकार्‍यांसोबत सेटिंग असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून वन्य प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.