वाहतूक पोलीस पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:32 IST2018-03-17T22:32:08+5:302018-03-17T22:32:08+5:30
वाहतूक पोलीस एका ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

वाहतूक पोलीस पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
ठळक मुद्देनिलंबनाची कारवाई : महामार्गावर चालतेय ट्रकचालकांकडून वसुली
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वाहतूक पोलीस एका ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पैसे घेणाऱ्या रणजित शेंडोकार (ब.न.१०६८) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
काही दिवसांपूर्वी एक वाहतूक पोलीस ट्रकचालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात पश्चिम झोन वाहतूक शाखेचे शेंडोकार दिसत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. पोलीस निरीक्षकांचे नावाने पैसे वसुलीचे टार्गेट असल्याचे सांगून अवैध वसुली होत असल्याचे पुढे आले आहे. याबाबत सखोल चौकशी करू, असे सीपी म्हणाले.