चिखलदरा दर्शन बसकडे पहिल्या दिवशी पर्यटकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:32+5:302021-01-04T04:11:32+5:30

फोटो - पी/०३/अनिल कडू फोल्डर (चिखलदरा दर्शन बस विठाई) परतवाडा : विदर्भाचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथील पर्यटनस्थळांना ...

Tourists read on the first day at Chikhaldara Darshan bus | चिखलदरा दर्शन बसकडे पहिल्या दिवशी पर्यटकांची पाठ

चिखलदरा दर्शन बसकडे पहिल्या दिवशी पर्यटकांची पाठ

फोटो - पी/०३/अनिल कडू फोल्डर (चिखलदरा दर्शन बस विठाई)

परतवाडा : विदर्भाचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथील पर्यटनस्थळांना (पॉईन्ट) बघण्याकरिता पर्यटकांसाठी खास सुरू करण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या चिखलदरा दर्शनबसकडे पर्यटकांनी पहिल्याच दिवशी पाठ फिरविली आहे. या चिखलदरा दर्शन बसमधून शनिवार, २ जानेवारीला एकाही पर्यटकाने प्रवास केला नाही. पण दुसऱ्या दिवशी रविवारी केवळ सहा पर्यटकांनी या बसला पसंती दर्शविली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभागाकडून ही अमरावती-चिखलदरा दर्शन बस शनिवार, २ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. दर शनिवार आणि रविवारी सकाळी ७ वाजता ती अमरावतीहून निघून परतवाडामार्गे परतवाडा बसस्थानकातून पुढे सरकते. ही बस पर्यटकांना चिखलदरा दर्शन घडवून सायंकाळी परतीच्या प्रवासाला लागणार आहे. या चिखलदरा दर्शनबसच्या आरक्षणाकरिता अमरावती (एएमटी) चिखलदरा (सीकेएलडी) हा सांकेतिक कोड देण्यात आला आहे. २६५ रुपयांत ही बस भिमकुंड, गाविलगड, देवी पॉईंट, मोझरी पॉईंट, बगीचा आणि पंचबोल अशा सहा पॉईंटचे दर्शन घडविणार आहे. प्रत्येक पॉईंटला अर्धा तासाचा अवधी देण्यात आला आहे. बगिच्यातला अवधी मात्र सव्वा तासाचा असून यात जेवण व विश्रांती पर्यटकांना घेता येणार आहे. पंचबोल पॉईंटवरून चिखलदरा मार्केट (मुख्य बाजार) चौकात चहा घेऊन सायंकाळी ४.१५ वाजता ही दर्शनबस अमरावतीकरिता निघणार आहे. चिखलदरा दर्शन विठाई बसमधून घडणार आहे.

दुसऱ्या दिवशी सहा पर्यटक

अमरावतीहून निघणारी ही दर्शनबस दुसऱ्या दिवशी रविवारी प्रवाशांच्या प्रतीक्षेत अमरावतीहूनच विलंबाने निघाली. चिखलदरा पोहचण्याच्या वेळेत ही बस परतवाडा आगारात रविवारी दाखल झाली. परतवाडा आगारात ही बस या दरम्यान चांगलीच चर्चेत राहिली. यात या विठाईला चिखलदरा दर्शनाकरिता केवळ सहा प्रवासी मिळालेत.

टप्पा प्रवाशी

चिखलदरा दर्शनबसमध्ये टप्पा प्रवाशांची संख्या बरी राहिली. अमरावतीहून परतवाडापर्यंत आणि परतवाड्याहून चिखलदऱ्यापर्यंत शनिवार आणि रविवारी प्रवास केला. आपले सहा प्रवासी घेऊन ही बस दुसऱ्या दिवशी चिखलदऱ्यातील पॉईन्टवर फिरणार आहे.

यापूर्वीही प्रयोग

चिखलदरा दर्शन बस सुरू करण्याचा हा महामंडळाचा चौथा प्रयोग ठरला आहे. यापूर्वी चार वेळा ही बस सुरू केल्या गेली. यात एसटीच्या लालपरीसह मिनीबस व तत्कालीन आशियाड व सेमी लक्झरी बसनेही चिखलदरा दर्शन घडविले. विठाईचा मात्र हा पहिलाच प्रयोग आहे.

Web Title: Tourists read on the first day at Chikhaldara Darshan bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.